20 April 2025 12:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळण्यासाठी राज्य सरकार कामगार ब्यूरोची स्थापना करणार

Corona Crisis, Maharashtra, labor bureau, Local Peoples

मुंबई, १५ मे: कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील लाखो मजूर आपापल्या राज्यात परतले आहेत. त्यामुळे भूमीपुत्रांना महाराष्ट्रात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. या संधी मिळवून देण्यासाठी राज्य सरकार कामगार ब्यूरोची स्थापना करणार आहे.

राज्यातील लाखो कामगार, मजूरांनी कोरोनाचे संकट आल्याने राज्यातील अनेक शहरांमधून आणि जिल्ह्यांमधून आपला संसार गुंडाळून आपलं गाव गाठलंय. यामुळे इथल्या उद्योगांसमोर एक नवं संकट उभं राहिलंय. आता इथल्या उद्योगांना मजूर आणि कामगारांची कमतरता जाणवणार आहे. त्यामुळे भूमिपुत्रांना या नोकऱ्या मिळवून देण्यासाठी राज्य सरकार कामगार ब्यूरोची स्थापना करणार आहे.

राज्यातील उद्योग, कामगार आणि कौशल्य विकास विभागातर्फे या कामगार ब्यूरोची स्थापना केली जाणार आहे. या कामगार ब्यूूरोकडे नोंदणी करणाऱ्या कामगारांची कुशल, अकुशल तसंच कौशल्याप्रमाणे विभागणी केली जाईल. यानंतर कामगारांना प्रशिक्षण दिले जाईल आणि उद्योगांच्या गरजेनुसार नोंदणी केलेल्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाईल. संकटात अनेकदा संधी चालून येते. राज्यातील परप्रांतीय कामगार राज्यातून निघून गेल्याने कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्रात लाखो नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. भूमीपुत्रांनी या नोकऱ्यांचा लाभ घ्यावा यासाठी सरकारही पुढे सरसावलंं आहे.

दरम्यान, कोरोनानंतरच्या काळात जगभरातल्या कंपन्यांसाठी केवळ चीन हा पर्याय असणार नाही. तिथून बाहेर पडणाऱ्या कंपन्यांनी महाराष्ट्रात यावं, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती सुभाष देसाईंनी दिली. ‘राज्याच्या कृती दलानं आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या देशातील गुंतवणूकदारांशी वाटाघाटी सुरू केल्या आहेत. यामध्ये अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, दक्षिण कोरिया, तैवान, जपानमधल्या गुंतवणूकदारांचा प्रामुख्यानं समावेश आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली.

 

News English Summary: The Corona crisis has forced millions of workers in the state to return to their home states. Therefore, Bhumiputras will have many job opportunities in Maharashtra. The state government will set up a labor bureau to provide these opportunities.

News English Title: Maharashtra government will set up a labor bureau opportunity for local people in Maharashtra News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या