23 February 2025 10:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

भाजपच्या सत्तेत देशात महागाई उच्चांकावर असताना शिंदे सरकारने 100 रुपयांच्या दिवाळी पॅकेजनंतर लाखांचा धिंडोरा पिटला

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde | मोदी सरकार सत्तेत आल्यापासून देशात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. सामान्य माणसाच्या खिशात पैसा टिकत नसल्याने अनेकांनी गरजा कमी करून पैसा वाचवायला सुरुवात केली आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने राज्यातील शिधापत्रिकाधारकांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दिवाळीत १०० रूपयांमध्ये डाळ, साखर, रवा आणि तेल हे साहित्य शिधावाटप धाराकांना दिलं जाणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

उद्या शिंदे सरकारचा दसऱ्यानिमित्त मेळावा आयोजित करण्यात आला आहे आणि त्याआधी जोरदार मार्केटिंग सुरु केल्याचं पाहायला मिळतंय. या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या या दिवाळी पॅकेजमध्ये 1 किलो रवा, चणाडाळ, साखर आणि तेल मिळणार आहे. दसऱ्याआधी ही गोड बातमी आम्ही राज्यातील जनतेला दिली आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. सरकारला 100 दिवस होत आहेत, त्यामुळे या वस्तू आम्ही 100 रुपयांमध्ये देत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

देशात महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. देशात घरगुती गॅसपासून ते जीवनावश्यक वस्तूंपर्यंत अनेक गोष्टी महाग झाल्या आहेत. एखादं चांगलं डेरीमिल्क चॉकलेट घ्यायला गेलं तरी ते ७०-८० रुपये मोजावे लागतात, तिथे दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गोष्टींमध्ये १०० रुपये म्हणजे हाताने धूळ झटकावी तसे सहज खर्च होतात. मात्र एखाद्या छोट्या गोष्टीला भलं मोठं भासवून मार्केटिंग करण्याची कला मुख्यमंत्री शिंदे यांनी भाजपच्या संगतीत अवगत केल्याचं पाहायला मिळतंय.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maharashtra govt cabinet decision on Diwali materials at low prices for ration card holders check details 04 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x