20 April 2025 1:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये मोठ्या अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मिळेल मोठा परतावा, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594
x

कोरोना टेस्ट अवघ्या २२०० रुपयांत, राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय

Maharashtra Govt, Slashes Charges, Covid 19 Tests, Private Labs

मुंबई, १३ जून: कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार खासगी लॅब्सना कोरोना चाचणीसाठी जास्तीत जास्त २२०० रुपयेच आकारता येतील. यापूर्वी कोरोनाच्या टेस्टसाठी साधारण ४४०० रुपये आकारले जात होते. खासगी लॅब्समध्ये यावर इतर कर लागून कोरोना टेस्टची किंमत बरीच जास्त होती.

मात्र, आता सरकारने या टेस्टसाठी २२०० रुपयांपेक्षा जास्त पैसे आकारू नयेत, असा आदेश काढला आहे. एखाद्या व्यक्तीच्या घरातून रक्ताचे आणि स्वॅबचे नमुने गोळा केले जात असतील तर त्यासाठी २८०० रुपये आकारण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, राज्य सरकारने कोरोना टेस्टसाठी किंमत निश्चित करुन दिल्यामुळे आता खासगी लॅब्सकडून होणारी लूट थांबणार आहे. यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

तत्पूर्वी हॉस्पिटलमधून स्वॅब ४५०० शुल्क आकारले जात होते. तर घरी जाऊन स्वॅब घेतल्यास ५२०० रुपये इतकं शुल्क रुग्णाला द्यावं लागत होतं,” असं टोपे यांनी सांगितलं. दरम्यान, आयसीएमआरने २५ मे रोजी सर्व राज्यांना पत्र पाठवून त्यांच्या राज्यात दर निश्चिती करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार कर्नाटक ने करोना चाचणीसाठी २२५० रुपये दर निश्चित केला तर तामिळनाडू ने २५०० रुपये व जम्मू- काश्मीर मध्ये २७०० रुपये दर निश्चित करण्यात आला.

 

News English Summary: The state government has taken an important decision against the backdrop of increasing outbreak of Corona virus. Accordingly, private labs can charge a maximum of Rs 2,200 for corona testing. Earlier, corona tests cost around Rs 4,400.

News English Title: Maharashtra Govt Slashes Charges For Covid Tests By Private Labs News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या