एकाच दिवशी दोन परीक्षा? | पण आरोग्य विभाग आणि TET दोन्ही परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार झालाय का?
मुंबई, २९ सप्टेंबर | आरोग्य विभागाची भरती परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने मोठा गदारोळ झाला. अखेर आरोग्य विभागाकडून गट ‘क’ साठी २४ तर गट ‘ड’ साठी ३१ ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. मात्र त्याच दिवशी राज्य परीक्षा परिषदेची शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) होणार आहे. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण (Health Department exam and TET exam) निर्माण झाले आहे. परीक्षेबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण संचालकांशी आपण बोलून मार्ग काढणार आहोत. उमेदवारांचे नुकसान होऊन देणार नाही, याची काळजी घेण्यात येईल, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
The health department has fixed October 24 for group ‘C’ and October 31 for group ‘D’. However, the Teacher Eligibility Test (TET) of the State Examination Council will be held on the same day. As both the exams are held on the same day, an atmosphere of confusion has been created among the candidates :
आयटी कंपनीच्या गोंधळामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की आरोग्य विभागावर आली होती. मात्र त्यातून आरोग्य विभागाने मार्ग काढत २४ व ३१ ऑक्टोबरला परीक्षा घेण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. मात्र त्याचदिवशी शिक्षण विभागाकडून टीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा सर्व शिक्षकांसाठी बंधनकारक असून, यापूर्वी ही परीक्षा १० ऑक्टोबरला होणार होती. मात्र त्याचदिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ही परीक्षा ३१ ऑक्टोबरला पुढे ढकलण्यात आली आहे. त्यातच आता आरोग्य विभागाची परीक्षाही त्याच दिवशी होणार आहे. त्यामुळे आरोग्य विभाग व टीईटीची परीक्षा देणार्या उमेदवारांना दोन्ही परीक्षा देणे शक्य होणार नसल्याने उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
उमेदवारांचे नुकसान होऊ नये:
उमेदवारांचे नुकसान होणार नाही याची सरकारकडून काळजी घेण्यात येईल, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. आरोग्य विभागाची परीक्षा तातडीची आहे. त्यामुळे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी बोलून टीईटी परीक्षेच्या तारखेबाबत विचार करण्याची त्यांना विनंती केल्याचे त्यांनी सांगितले. मुलांचे नुकसान होऊ नये, म्हणून शिक्षण संचालकांशीही बोलणार आहे. अजून एक महिना आहे. यातून मार्ग काढला जाईल, विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेईल, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: Maharashtra Health department exam and TET exam on same day increases confusion of students.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: TATATECH
- Post Office Schemes | दररोज 100 रुपये वाचवून पोस्टाच्या 'या' भन्नाट योजनेत गुंतवा, मिळेल लाखो रुपयात परतावा
- Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअर फोकसमध्ये, सेंट्रम ब्रोकिंग फर्म बुलिश, मालामाल करणार शेअर - NSE: TATASTEEL
- Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित 'या' 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
- Mutual Fund SIP | पगारदारांना SIP गुंतवणूक बनवेल 2.2 कोटींची मालक, 4000 रुपयांची गुंतवणूक ठरेल फायद्याची, पहा कॅल्क्युलेशन
- BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा