5 November 2024 6:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

Maharashtra Health Department Exam 2021 | आरोग्य विभाग परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर

Health Minister Rajesh Tope

मुंबई, २७ सप्टेंबर | आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांनी मनस्ताप व्यक्त केला होता. आज दुपारी 2 ते 3 तास बैठक झाली त्यामध्ये 24 ऑक्टोबर गट क ची परीक्षा तर गट ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय झाल्याची माहिती माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. या दोन्ही दिवशी रविवार असल्यानं शाळा उपलब्ध होतील, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. परीक्षेच्या तयारीसाठी (Maharashtra Health Department Exam 2021) डॅशबोर्ड द्यावा, परीक्षा केंद्रांची माहिती, उपलब्ध शाळांची माहिती 1 ऑक्टोबरपर्यंत द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Maharashtra health minster Rajesh Tope announced health department exam Date for group c group d recruitment 2021 :

विद्यार्थ्यांना 9 दिवस अगोदर हॉल तिकिट मिळणार:
राजेश टोपे यांनी यावेळी 9 दिवस आधी हॉलतिकीट दिले जाईल, अशी देखील माहिती दिली. विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका कुठलेही चुकीचे काम होऊ देणार नाही, असं म्हटलं. मोठ्या स्वरुपाची परीक्षा होत असेल तर अशा वावड्या उठताता. त्यावरकारवाईच्या सूचना दिल्या आहेत. कुणीही काहीही चुकीच्या गैर मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला तर संबंधित विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पोलीस स्टेशनला तक्रार करावी. परीक्षा पारदर्शकचं व्हाव्यात काही असेल तर तातडीने पोलिसात तक्रार नोंदवा, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं. चुकीच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका, चुकीचं काही दिसत असेल तर तातडीनं तक्रार दाखल करा, असं राजेश टोपे म्हणाले.

ऑडिओ क्लिपचा तपास होणार:
ऑडिओ क्लिप कुणी बनवली त्यात तथ्य आहे का.? अशा कुठल्याही बाबतीत पोलीस ठाण्यात तक्रार द्याव्यात ही मी विनंती करत आहे, असं राजेश टोपे म्हणाले. आम्हाला नावे कळले तर आम्ही तक्रार देऊ, आम्ही अमरावती आणि पुणे एसपी ला पत्र देऊन कळवलं आहे, असंही राजेश टोपे म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Maharashtra health minster Rajesh Tope announced health department exam Date for group c group d recruitment.

हॅशटॅग्स

#RajeshTope(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x