23 February 2025 2:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

मनसे आमदाराच्या मागणीला यश; 'दिशा' कायद्याच्या अनुषंगाने गृहमंत्री आंध्रचा दौरा करणार

Andhra Pradesh Disha Law, Minister Anil Deshmukh, MNS MLA Raju Patil

मुंबई: माणुसकीला काळीमा फासणारी आणि अवघ्या महाराष्ट्राचं मन सुन्न करणारी घटना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडली होती. त्यानंतर मुलीचा जीव घेणाऱ्या नराधमाला फासावर लटकवा, अशी मागणी संपूर्ण राज्यभरातून होऊ लागली. अनेक महिला आज कोणत्या ना कोणत्या नराधमाच्या अत्याचाराच्या बळी पडत आहेत आणि त्यांचं उभं आयुष्य संपत आहे. त्यात न्यायालयीन प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याने, न्याय मिळण्यास देखील प्रचंड उशीर लागतो. त्यामुळे कडक कायद्याची मागणी सात्यत्याने पुढे येतं आहे.

“आरोपीला कोणताही दया माया दाखवली जाणार नाही असं सरकार म्हणत आहे. या सगळ्याचा आम्ही पाठपुरावा करु. अनेकदा अशा प्रकरणांची न्यायालयात बराच वेळ सुनावणी सुरु असते. निकाल लागला तरी शिक्षा होण्यास वेळ लागतो. तसं या बाबतीत घडू देणार नाही. लवकरात लवकर गुन्हा सिद्ध करुन आरोपीला फासावर लटकवू,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. वास्तविक महाविकास आघाडीतील सर्वच प्रमुख नेते महाराष्ट्राच्या लेकीचा जीव गेल्यानंतर आम्ही हे करू आणि ते करू अशी भावना व्यक्त करत आहेत.

वास्तविक मंत्रिमंडळ वाटप आणि सत्तेच्या सौदेबाजीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी व्यस्त असताना मनसेचे आमदार राजू पाटील यांनी आंध्र प्रदेश सरकार प्रमाणे बलात्कार आणि महिला अत्याचारासंबंधित “दिशा कायदा” महाराष्ट्रात देखील अमलात आणावा यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र देऊन विनंती केली होती. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून भाजप सरकारच्या काळातील प्रकल्प रद्द करण्यासाठी शक्ती पणाला लावल्याचं दिसलं आणि त्यात तिन्ही सत्ताधारी पक्ष हातात हात धरून एकत्र आल्याचे दिसले. मात्र सत्ताधाऱ्यांनी तशीच एकी आणि इच्छा शक्ती मनसे आमदार राजू पाटील यांनी दिलेल्या संवेदनशील सूचनेकडे देऊन आंध्र प्रदेश प्रमाणे कायदा महाराष्ट्रात अमलात आणला असता तर आरोपीला २१ दिवसात शिक्षा सुनावत आली असती. परंतु आमदार राजू पाटील यांचं १७ डिसेंबर २०१९ मधील ते पत्र राजकीय चष्म्यातून आणि गांभीर्यातून न घेतल्याने सरकारवर आज आम्ही हे करू आणि ते करू अशी वेळ आली आहे, अशी चर्चा सुरु झाली होती.

त्यामुळे उद्या आरोप सुटले किंवा विलंब झाल्यास सरकार कोंडीत अडकणार असल्याने सरकारच्या वतीने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार असून महिला अत्याचार आणि बलात्कार अपराधांच्या संबंधित दिशा कायद्याचं स्वरूप समजून घेणार असल्याचं वृत्त आहे. त्यामुळे उद्या अभ्यासाअंती हा कायदा महाराष्ट्रात अमलात आल्यास ते मनसेसाठी देखील मोठं यश असले अशी चर्चा होऊ लागली आहे.

काय होतं ते मुख्यमंत्र्यांना दिलेलं नेमकं पत्र?

 

Web Title: Maharashtra Home Minister Anil Deshmukh will go on tour of Andhra Pradesh for studying Disha law.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RajuPatil(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x