24 January 2025 9:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Zomato Share Price | झोमॅटो शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ZOMATO HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक शेअर 5 रुपयांवरून 1665 रुपयांवर पोहोचला, पुढची टार्गेट नोट करा - NSE: HDFCBANK Wipro Share Price | विप्रो शेअर 7 रुपयांवरून 317 रुपयांवर पोहोचला, आता पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: WIPRO Bonus Share News | संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, शेअरने 4038 टक्के परतावा दिला - BOM: 531771 Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: TATAPOWER Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा
x

लॉकडाऊनमध्ये मराठी गृहिणींनी सुरु केला ढोकला उद्योग, मिळतंय यश, त्यांना प्रोत्साहित करा

Maharashtra, Latur Dhokla story, lockodwn

लातूर, ३ जुलै : ग्रामीण भागात रोजगाराच्या कमी संधी यातून बहुतांश महिलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी असते. त्यामुळे दुसरे कुठले काम सुरू करायचे म्हटले तरी या पर्यायाचा फारसा विचार करता येत नाही. शिवाय मुलांच्या जबाबदारीचा गाडा या महिला एकट्याने रेटत असतात. ग्रामीण भागात ९०% महिलांचे रोजीरोटी कमावण्याचे माध्यम हे शेतमजुरी, घरगुती गोळ्या-चॉकलेटचे दुकान, भाजीपाला विक्री, बिगारी काम किंवा मनरेगा रोजगार हमी योजनेत जर कधी काम मिळाले तर हे असते.

काहीजणी जर गावात कुठला समारंभ असेल तर त्या ठिकाणी स्वयंपाक करण्याचे काम करतात. या सगळ्या कामाची मजुरी पुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असल्याचे दिसून येते. बचत गटांनी ग्रामीण भागातील महिलांना सक्षमपणे जगण्याचे एक साधन मिळाले आहे. ज्या काही महिला बचत गटाच्या सदस्य आहेत त्यांना गटाच्या माध्यमातून अडीअडचणीच्या वेळी मोलाची मदत होते. अशा सगळ्या स्थितीत ग्रामीण भागातील महिला आपले कुटुंब चालवितात.

कोरोनामुळे सरकारने देशात आणि राज्यात लॉकडाऊन घोषित केला. त्यामुळे सगळे व्यवहार जागच्या जागी थांबले. गावात देखील कामधंदे ठप्प झाले आहेत. मात्र लातूरच्या दोन गृहिणींनी लॉकडाउनमध्ये कमाल केली आहे. ढोकळे बनविण्याच्या छंदाला लातूरमधल्या सासू आणि सुनेच्या जोडीने लॉकडाऊनमध्ये व्यवसायाचं स्वरुप दिलं आहे. विशेष म्हणजे घरगुती ढोकळे बनविण्याच्या या छंदातून त्यांना तीन महिन्यात दीड लाखांचा नफा झाला आहे.

लातूरमधल्या दैवशाला शेटे आणि त्यांच्या सासूबाई सुरेखा शेटे या दोघींचं मुळात बांगड्या विकण्याचा व्यवसाय आहे. मात्र, लॉकडाऊनमध्ये बांगड्यांचा व्यवसाय ठप्प झाला आणि हातचं काम थांबलं. घरात छंद म्हणून सुनबाई चांगले ढोकळे बनवायच्या. मग, याच छंदाला त्यांनी व्यवसाय बनवायचे ठरवलं. युट्यूबवरुन त्यांनी याबाबतची सर्व माहिती मिळवली. आता त्या घरातल्या मिक्सरवरुन ४५ प्रकारचे ढोकळे बनविण्याचे पीठ तयार करतात. व्यवस्थित पॅकिंग करुन त्यांनी आता मोठ्या मॉलमध्येही विक्रीला सुरुवात केली आहे.

आता त्यांना हा व्यवसाय वाढवायचा आहे. लॉकडाऊनच्या तीन महिन्यात त्यांना या ढोकळे पिठाच्या विक्रीपासून दीड लाखांचा निव्वळ नफा झाल्याचं त्या सांगतात. लॉकडाऊनमध्ये घरातल्या-घरात उद्योग सुरु करुन यशस्वी करणाऱ्या या सासू-सुनेच्या ढोकळ्यांची उपलब्धता लवकरच देशभरात होईल, अशी त्यांची जिद्द आहे.

 

News English Summary: Daivshala Shete of Latur and his mother-in-law Surekha Shete are both in the business of selling bangles. However, the bangle business came to a standstill in the lockdown and the handicrafts stopped. Sunbai wanted to make good dhoklas as a hobby at home.

News English Title: Maharashtra Latur Dhokla story duo of mother in law and daughter in law who make Dhokla and earn lakh during lockodwn News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x