25 December 2024 12:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदार करत आहेत मोठी कमाई, SBI फंडाच्या दोन योजना पैसा अनेक पटीने वाढवत आहेत NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: NTPC Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 34% पर्यंत परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: TATAMOTORS
x

लोकांचा श्वास कोंडतोय अन दोन गुजराती नेत्यांची ऑक्सिजनवरून भिन्न विधानं | राज्याला बदनाम करणं हेच ध्येय?

Maharashtra Oxygen supply

मुंबई, १८ एप्रिल: आज दिवसभरात राज्यात ६८ हजार ६३१ करोनाबाधित वाढले असून, ५०३ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.५८ टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत ६० हजार ४७३ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, राज्यात आज रोजी एकूण ६,७०,३८८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, काल नवाब मलिक यांनी रेमडेसिवीर पुरवठ्यावरून केंद्रावर टीका केल्यानंतर पियुष गोयल यांनी ट्वीट करत राज्य सरकारला लक्ष्य केलं होतं. “ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून उद्धव ठाकरेंनी चालवलेले प्रकार पाहून दु:ख झालं. केंद्र सरकार देशात जास्तीत जास्त ऑक्सिजनचं उत्पादन व्हावं यासाठी प्रयत्नशील आहे. आपण सध्या आपल्या क्षमतेच्या ११० टक्के ऑक्सिजनची निर्मिती करत असून उद्योग क्षेत्राचा ऑक्सिजन देखील वैद्यकीय वापरासाठी उपलब्ध करून दिला जात आहे”, असं पियुष गोयल म्हणाले होते. विशेष “उद्धव ठाकरेंनी त्यांचा हा निर्लज्ज राजकारणाचा रोजचा डोस थांबवावा आणि जबाबदारी घ्यावी”, असं ट्वीट पियुष गोयल यांनी मध्ये म्हटलं होतं.

पुढे त्यांनी असंही म्हटले होते की, राज्याला (महाराष्ट्राला) सर्वाधिक ऑक्सिजन पुरवला जात असल्याचा दावा केला होता. “आत्तापर्यंत महाराष्ट्राला देशात सर्वाधिक ऑक्सिजन पुरवण्यात आला आहे. केंद्र सरकार सातत्याने राज्य सरकारांच्या संपर्कात असून त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करत आहे”, असं गोयल म्हणाले होते. विशेष म्हणजे त्यांनी १०० टक्के नव्हे तर चक्क ११० टक्के एवढा आकडा सांगताना सर्वाधिक पुरवठा महाराष्ट्राला करत असल्याचं म्हटलं होतं.

मात्र दिल्लीतील एक गुजराती नेते ट्विट करताना मुख्यमंत्र्यांसंदर्भात ‘निर्लज्ज’ असा शब्दप्रयोग करताना दिसले. तर मुंबईतील दुसरे गुजराती भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी ट्विट केलं आहे त्यावरून पियुष गोयल खोटं बोलत आहेत की किरीट सोमैय्या खोटं बोलत आहेत असा प्रश्न निर्माण होतो आहे. मात्र यामध्ये महाराष्ट्र बदनाम करण्याचं मोठं षडयंत्र आहे यामध्ये शंका नाही असंच म्हणावं लागेल. सामान्य रुग्णांचा ऑक्सिजन अभावी श्वास घुटमळत असताना भाजप नेते त्यावर देखील स्वतःचं राजकारण साधत आहेत यात शंका नाही.

 

 

News English Summary: A Gujarati leader from Delhi was seen tweeting the word ‘shameless’ about the Chief Minister. Another Gujarati BJP leader in Mumbai, Kirit Somaiya, has tweeted that Piyush Goyal is lying or that Kirit Somaiya is lying. But there is no doubt that there is a big conspiracy to discredit Maharashtra. There is no doubt that BJP leaders are pursuing their own politics while ordinary patients are suffocating due to lack of oxygen.

News English Title: Maharashtra Oxygen supply vary statement statements by BJP leaders Piyush Goyal and Kirit Somaiya news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x