26 December 2024 1:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
x

महाराष्ट्रात कोरोना विक्रम रचतोय...एका दिवसात ५ हजार २४ रुग्ण

Maharashtra reports, COVID 19 positive, Corona Virus

मुंबई, २४ जून : महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच कोरोना रुग्णांचा आकडा एका दिवसात ५ हजारांपेक्षा जास्तने वाढला आहे. आजच्या एका दिवसात कोरोनाचे सर्वाधिक ५,०२४ रुग्ण वाढले आहेत. तर १७५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, यातले ९१ मृत्यू हे मागच्या ४८ तासातील आहेत, ८४ मृत्यू हे मागच्या काळातील आहेत. सध्या राज्यातला मृत्यूदर हा ४.६५ टक्के एवढा आहे. राज्यात आत्तापर्यंत ७,१०६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या १,५२,७६५ एवढी झाली आहे. तर सध्या ६५,८२९ रुग्ण हे ऍक्टिव्ह आहेत. आज २,३६२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, त्यामुळे पूर्णपणे बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची एकूण संख्या ७९,८१५ एवढी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे व्हायचे प्रमाण ५२.२५ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ८ लाख ७१ हजार ८७५ नमुन्यांपैकी १ लाख ५२ हजार ७६५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ५८ हजार ४८८ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर ३६ हजार ९०३ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १ लाख ५२ हजार ७६५ इतकी झाली आहे.

 

News English Summary: Maharashtra reports 175 deaths and 5024 new COVID19 positive cases. Out of the total 175 deaths, 91 deaths are of last 48 hours and 84 deaths are of previous dates but recorded today. There are 65,829 active cases in the State.

News English Title: Maharashtra reports 175 deaths and 5024 new COVID19 positive cases News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x