SSC HSC Exams | परीक्षा संदर्भात शिक्षण मंत्र्यांची महत्त्वाची बैठक

मुंबई, ५ एप्रिल: महाराष्ट्र राज्यात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत 57,074 नवीन कोरोनाबाधीत रुग्ण आढळले. त्यामुळे देशात सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्र राज्यात आढळले असून या आकड्यांची तुलना इतर देशांशी केल्यास महाराष्ट्राची संख्या भारत आणि फ्रान्स देशाच्या ही पुढे जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 30 पर्यंत वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला आहे.
या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात उद्या महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही बैठक बोलवली आहे. या बैठकीत दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाणार आहे.
वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा कशा पद्धतीने घ्यायच्या अशा प्रश्न अनेकांना पडला आहे. याच पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड यांनी महत्त्वपूर्ण बैठक बोलवली आहे. उद्या (6 एप्रिल) ही बैठक होणार आहे. या बैठकीला शिक्षण मंडळाचे विविध अधिकारी उपस्थित असतील.
या बैठकीत दहावी-बारावीच्या परीक्षा कशा पद्धतीने घ्यायच्या यावर चर्चा होणार आहे. तसेच शनिवारी आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊन घोषित झाला आहे. त्यामुळे शनिवारी होणार्या पेपरचं काय होणार, त्याचे कशाप्रकारे आयोजन करायचं, यावरही चर्चा होणार आहे.
News English Summary: The number of patients is increasing day by day due to the second wave of Corona epidemic in the state of Maharashtra. In the last twenty-four hours, 57,074 new coronavirus patients were found in the state. Therefore, Maharashtra has the highest number of patients in the country and if these figures are compared with other countries, the number of Maharashtra is likely to surpass that of India and France. Against this backdrop, the state government has announced a 30-week weekend lockdown.
News English Title: Maharashtra SSC HSC exams education minister Varsha Gaikwad important meeting news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल