3 December 2024 11:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

'राजकीय' कंत्राटी भरती तरुणांना मोठ्या महाबेरोजगारीकडे घेऊन जाणार: सविस्तर

Devendra Fadanvis, Uddhav Thackeray, Shivsena, BJP Maharashtra, Unemployment, Jobs. Temporary Jobs, Contract Jobs

मुंबई : लोकसभा निवडणुकीत देखील मोठ्या प्रमाणावर विविध खात्यांच्या भरती संदर्भातील बातम्या वेगेने येताना दिसत होत्या. त्यानंतर असलेले उच्च पदावरील अधिकारी ते खालच्या पदावरील अधिकाऱ्यांना देखील नारळ देऊन त्याजागी खाजगी सेवेतील लोकांना नियुक्त करण्याचा सपाटा केंद्र सरकारने लावला. दरम्यान लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र शासनाने देखील एकावर एक अशा अनेक खात्यांच्या भरती सदंर्भातील बातम्या पेरण्यास सुरुवात केली होती आणि त्यानंतर सर्वच गुदस्त्यात बांधलं गेलं.

मात्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुका तोंडावर येताच पुन्हा सरकारी खात्यातील भरत्या आणि त्यासंदर्भातील बातम्या राज्य सरकारने पेरण्यास सुरुवात केली आहे कारण अगदी ८-१० जागांच्या कंत्राटी भरती करता जरी अर्ज मागवण्यात आले तरी त्याकरिता हजारोने अर्ज दाखल होतात आणि तेच अर्ज करणारे उमेदवार नोकरी लागण्याच्या आशेने सरकारचे मतदार बनतात आणि विद्यमान सरकार पडलं आणि नवं सरकार स्थापन झालं तर भरती प्रक्रिया रद्द किंवा नव्याने तर करणार नाही ना, या भेटीने विद्यमान सरकारला मतदान करणं पसंत करतात. हेच मानवी स्वभावाचं विज्ञान ओळखून विद्यमान सरकारने पुन्हा सर्वच खात्यांच्या कंत्राटी भरती संबंधित बातम्या पेरण्यास सुरुवात केली आहे आणि कारण आहे आगामी विधानसभा निवडणुका.

मात्र याच कंत्राटी भरतीने बेरोजगार असलेल्या तरुणांची आयुष्य अजूनच महाबेरोजगारीत रूपांतरित होण्याची शक्यता आहे. कारण ३-४ वर्षाच्या कंत्राटी भरतीमुळे वयाच्या २५-३० नोकरी मिळाते ज्याचे सरकारी फायदे अजिबात मिळत नाहीत आणि भर लग्नाच्या वयात युवक पुन्हा बेरोजगार होतात आणि पुन्हा निराशेच्या गर्तेत अडकण्याची दाट शक्यता निर्माण होते. तसेच त्याचे सर्वात जास्त परिणाम हे ग्रामीण भागात भोगावे लागतात जेथे नोकरीच्या फारश्या संधी उपलब्ध नसतात. सरकारकडे पैसाच नसल्याने सरकार जे मार्ग अवलंबत आहे त्याने बेरोजगार तरुण भविष्यत अजूनच निराशेच्या गर्तेत ढकलले जाणार आहेत.

भाजप सरकार कितीही रोजगार निर्मितीचे मोठं मोठे दावे करत असलं तरी मंत्रालयातील वेटर या पदासाठी सुरु झालेल्या भरती प्रक्रियेवरून बेरोजगारीचे भीषण वास्तव उघड केलं होतं. अगदी चौथी पास पात्रता असलेल्या १३ जागांसाठी तब्बल ७००० अर्ज आले होते, त्यात धक्कादायक म्हणजे सुशिक्षित पदवीधर उमेदवारांची संख्या त्यात सर्वाधिक आहे. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, मागील वर्षी म्हणजे ३१ डिसेंबर २०१८ मध्ये सदर पदासाठी उमेदवारांची परीक्षा पार पडली. सध्या त्याच उमेदवारांची कामावर रुजू होण्याची शेवटची प्रक्रिया सुरु आहे. अंतिम निवड झालेल्या १३ उमेदवारांपैकी ८ पुरुष तर ५ महिला उमेदवार आहेत. त्यापैकी २-३ उमेदवारांनी अजून सुद्धा अंतिम कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही.

धक्कदायक म्हणजे वेटर या पदासाठी निवड झालेल्या एकूण १३ उमेदवारांपैकी १२ उमेदवार हे पदवीधर आहेत तर १ उमेदवार बारावी उत्तीर्ण होते. दुसरं म्हणजे कमीत कमी इयत्ता ४थी पास अशी शिक्षणाची अट असताना सुद्धा प्रशासनाने पदवीधरांची वेटर पदासाठी निवड केल्याने त्यांच्यावर टीका सुद्धा करण्यात येते आहे. महत्वाचं म्हणजे वेटर या पदासाठी सुद्धा उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली होती.

आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी म्हणजेच महावितरणमध्ये तब्बल ७००० जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. त्यामुळे बेरोजगार तरुणांसाठी आता रोजगार उपलब्ध झाला आहे. महावितरणने एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये ७००० जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. विद्युत सहाय्यकाची ५००० आणि उपकेंद्र सहाय्यकाची २००० पदं भरली जात आहेत, ज्यासाठी २६ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. यासाठी उमेदवाराची पात्रता किमान १२ वी पास असणं आवश्यक आहे, तसंच त्याच्याकडे राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.

दरम्यान, यासाठी उमेदवाराचं वय १८ ते २७ या दरम्यान असणं गरजेचं आहे. तसेच विविध आरक्षणानुसार वयामध्ये सूट लागू राहणार आहे. तसेच ही भारती कंत्राटी पद्धतीच्या स्वरुपात होणार आहे. या भरतीमध्ये पात्र उमेदवाराला तीन वर्षांच्या कंत्राटावर सेवा करण्याची संधी मिळणार आहे. तसेच अशा कंत्राटी पद्धतीच्या भरत्या जवळपास सर्वच खात्यात होणार आहेत. जर नोकरी कंत्राटी पद्धतीच्या असतील तर तरुणांनी थेट खाजगी कायमस्वरूपी नोकरी शोधून सरकारच्या मोहजालात न अडकणं कधीही उत्तम, कारण सरकारी खात्यातील कंत्राटी पद्धतीची भरती असल्याने उमेदवाराला कोणताही सरकारी कर्मचाऱ्यांना होणार फायदा मिळणार नाही जसं पेंशन वगरे. मात्र ESIC आणि EPF आहे ना अशा पेरण्या करून सरकार देखील उमेदवारांना अंधारात ठेवतं, कारण यातील बहुतेक तरुणांना ESIC आणि EPF सारखे फायदे खाजगी नोकरीत देखील असतात ते माहीतच नसतं. मात्र नोकरीवर ‘सरकारी’ ठोकळा अशा गर्तेत अडकलेले तरुण स्वतःचं भविष्य चक्रव्यूहात अडकवत आहेत असंच म्हणावं लागेल. कारण सरकारी नोकरीचा अनुभव कोठेही ग्राह्य धरला जात नाही, कारण खाजगी कंपन्यांना सरकारी कामाची पद्धत चांगलीच माहित असते.

दुसरीकडे आधीच जागतिक स्तरावरील नोकऱ्यांची कमतरता असताना आता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे म्हणजे तंत्रज्ञानाच्या ऑटोमेशनमुळे रोजगारांवर मोठं संकट येण्याची शक्यता आहे. कारण याच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे जगभरातील ७ कोटींपेक्षा अधिक जणांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागू शकतात, असा अहवाल एका जग विख्यात संस्थेने प्रसिद्ध केला आहे.

याच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे मनुष्य करू शकेल अशी अनेक कामं मशिन्सच्या माध्यमातून होतील आणि त्यामुळे कोट्यवधी लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागतील आणि बेरोजगार होण्याची वेळ येईल. अगदी अकाउंटिंग, ड्रायव्हर, डाटाएंट्री पासून ते थेट रिसेप्शन आणि शॉपिंगसारखी असंख्य कामं ही भविष्यात आता मशिन्सच्या माध्यमातूनच होणार आहेत. या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे चुकांची शक्यताही जवळपास संपुष्टात येते तसेच उत्पादकताही वाढते. त्यामुळं कोणतीही छोटी मोठी मनुष्य आधारित कामं तसेच उच्च दर्जाची काम सुद्धा याच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे होणार आहेत.

या अहवालात सूचित करण्यात आल्याप्रमाणे पुढील ७ वर्षांमध्ये मनुष्याची अर्ध्यापेक्षा अधिक कामं म्हणजे जवळपास अंदाजे ५२ टक्के कामं ही ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आधारित मशिन्स करतील. सध्या मनुष्याच्या एकूण कामांपैकी केवळ २९ टक्के कामं ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आधारित मशिन्स करतात आणि प्रमाण भविष्यात थेट ५२ टक्क्यांवर जाणार आहे. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ आधारित मशिन्समुळे अगदी डॉक्टर्स, प्राध्यापक, पत्रकार, टेक्नेशियन्स, व्हेंडर्स, ऑपरेटर्स, विश्लेषण करणारे तज्ज्ञ, व्हिडीओ एडीटर्स, कॅमेरामन्स अशा एक ना अनेक क्षेत्रांमध्ये नोकरी जाण्याचा मोठा धोका भविष्यात आहे. त्यामुळे उद्योगांची वेतनावर होणारी प्रचंड अर्थशक्ती बचत होणार आहे.

त्यामुळे केवळ जगभरातीलच नव्हे तर भारतातील अनेक दिग्गज कंपन्यांनी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’वर प्रचंड गुंतवणूक करण्यास सुरुवात केली असून कामगार, पगार आणि कर्मचाऱ्यांना द्याव्या लागण्याच्या सुविधा या पासून स्वतःची सुटका करण्यासाठी घेण्यासाठी आणि उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी मालकांनी गुणतवणूक खर्ची घालण्याचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे तरुणांनी सरकारच्या निवडणुकीच्या मोहजालात न अडकता भविष्यकाळाकडे पाहून योग्य ती पावलं उचलावी आणि स्वतःच भविष्य स्वतःच सुरक्षित करण्याची वेळ आली आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x