9 January 2025 12:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | घाई करा, ऑफर संपण्यास केवळ 3 दिवस बाकी, ऑफरबद्दल पटापट जाणून घ्या, 500GB डेटा वापरता येणार IPO GMP | आला रे आला IPO आला, प्राईस बँड सहित डिटेल्स जाणून घ्या, मजबूत कमाईची संधी सोडू नका - IPO Watch Alok Industries Share Price | रिलायन्स गृप कंपनीच्या 20 रुपयाच्या शेअर्सची जोरदार खरेदी, मालामाल करणार शेअर - NSE: ALOKINDS 15x15x15 Formula | श्रीमंतीचा राजमार्ग, 15x15x15 हा फॉर्म्युला वयाच्या 40 व्या वर्षी बनवेल करोडपती, फायदा जाणून घ्या EPF on Salary | तुमच्या पगारातून EPF कापला जात असेल तर खात्यात जमा होणार 2 कोटी 53 लाख रुपये, अपडेट जाणून घ्या Nippon India Mutual Fund | या 3 म्युच्युअल फंड योजना ठरतील मार्ग श्रीमंतीचा, मिळेल 1.02 कोटी रुपये ते 1.27 कोटी रुपये परतावा Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर फोकसमध्ये, टॉप ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS
x

पावसाळी अधिवेशन तोंडावर तरी विधानसभा अध्यक्षांचे नाव निश्चित नाही | नाना पटोले तातडीने दिल्लीला

Congress Nana Patole

मुंबई, २४ जून | पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तातडीने दिल्लीला बोलवण्यात आले आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्याचा दौरा अर्धवट सोडून नाना पटोले दिल्लीला रवाना होणार आहे. नवी दिल्लीत काँग्रेसची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिल्लीत येण्याचे पक्षश्रेष्ठींनी आदेश दिले आहे. नाना पटोले ३ दिवसांच्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहे.

मात्र, धुळे जिल्ह्याचा दौरा अर्धात सोडून आज (२४ जून) सायंकाळी नाना पटोले मुंबईला जाणार आहे. आज संध्याकाळीच मुंबईहून पुढे दिल्लीला रवाना होणार आहे. पावसाळी अधिवेशन आता जवळ असून अद्याप विधानसभा अध्यक्षांचे नाव निश्चित झाले नाही. त्यामुळे हे नाव निश्चित करण्यासाठी दिल्ली जात असल्याचं पटोलेंनी सांगितलं आहे.

अत्यंत महत्वाची बैठक:
नवी दिल्लीत काँग्रेसची उद्या (२५जून) महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिल्लीत जाण्याचे पक्षश्रेष्ठींनी आदेश दिले आहे. नाना पटोले ३ दिवसांच्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहे. पावसाळी अधिवेशन येऊ घातले असून अद्याप विधानसभा अध्यक्षांचे नाव निश्चित झाले नाही. त्यामुळे हे नाव निश्चित करण्यासाठी दिल्ली जात असल्याचं पटोलेंनी सांगितलं आहे.

नाना पटोले हे वारंवार स्वबळाची भाषा करतात आणि याच स्वबळाच्या भाषेवरून आता काँग्रेसच्याच काही नेत्यांनी नाराजी दर्शवली अजून निवडणुकांना बराच वेळ आहे म्हणून आत्ताच स्वबळाची भाषा करणे योग्य नाही अशी देखील दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार देखील नाराज आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Maharashtra state congress president Nana Patole urgently moved to Delhi for meeting news updates.

हॅशटॅग्स

#NanaPatole(39)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x