5 February 2025 7:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme | सरकारी PPF योजना ठरेल फायद्याची, अवघी 100 रुपयांची गुंतवणूक 10 लाख रुपयांचा परतावा देईल SBI Car Loan | एसबीआय बँकेकडून 5 वर्षांसाठी 8 लाखांचे कार लोन घेतल्यानंतर किती EMI हप्ता भरावा लागेल, रक्कम जाणून घ्या TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका Rent Agreement | सावधान, भाड्याने घर घेताना ॲग्रीमेंटमधील 'ही' कलमे अवश्य वाचा, अन्यथा मोठं नुकसान होईल IRB Infra Share Price | 54 रुपयाचा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Tata Mutual Fund | जबरदस्त फंड, 2000 च्या SIP बचतीवर 2 कोटी रुपये मिळतील, तर एकरकमी 1 लाखावर 3.5 कोटी मिळतील Old Vs New Tax Regime | पगारदारांसाठी कोणती टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल, तुमचा फायदा कुठे सोप्या शब्दांत जाणून घ्या
x

सीबीएसई, आयसीएसई शाळांत यंदापासूनच मराठी अनिवार्य : राज्य सरकारचा आदेश

Maharashtra, GR Issues, Marathi Compulsory, CBSE ICSE

मुंबई, १ जून: महाविकास आघाडीने सरकारने सीबीएसई, आयसीएसई, केंब्रिज यासह अन्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांच्या सर्व माध्यमांच्या शाळांत मराठी भाषा हा विषय सक्तीचा करणारा आदेश आज लागू केला. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी तो जाहीर केला. राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी हा विषय अध्ययन अध्यापनामध्ये सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे.

यासंदर्भात शासन निर्णय काढण्यात आला असून २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. तसंच यावर्षी इयत्ता पहिली आणि सहावीच्या सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी हा विषय सक्तीचा करण्यात येणार आहे.

राज्यातील शाळांमध्ये टप्प्याटप्प्यानं मराठी हा विषय सर्व शाळांमध्ये सक्तीचा करण्यात येणार आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात पहिली आणि सहावीसाठी, २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात दुसरी आणि सातवीसाठी, २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात तिसरी आणि आठवीसाठी, तर २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात चौथी आणि नववीसाठी, तर २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात पाचवी आणि दहावीसाठी मराठी हा विषय सक्तीचा करण्यात येणार आहे. शासन आदेश काढून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.

कर्नाटक, केरळ, तामिळनाडू व तेलंगणा या राज्यांच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मराठी भाषा अनिवार्य करताना त्यासाठी पदनिर्मितीस मान्यता देण्यात आलेली नाही. यासाठीच्या सोयी निर्माण करण्याची जबाबदारी संबंधित शाळांवर टाकण्यात आलेली आहे. परदेशातून शिक्षण घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांसाठी सवलत अथवा मराठी या विषयातून पूर्णतः सूट देण्याचा अधिकारही शाळांना देण्यात आलेला आहे. महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर मराठी भाषा अनिवार्य करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला.

 

News English Summary: The Mahavikas Aghadi government today issued an order making Marathi language compulsory in all medium schools of CBSE, ICSE, Cambridge and other international education boards. Education Minister Varsha Gaikwad announced it.

News English Title: Maharashtra state government issued GR compulsory Marathi subject for all educations boards News latest updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x