26 December 2024 12:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर, अपडेट नोट करा - NSE: IRFC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर निगेटिव्ह परताव्यामुळे फोकसमध्ये, आता फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडियाचा पेनी शेअर अजून घसरणार, कंपनीबाबत अपडेट आली - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत महत्वाचे संकेत, तज्ज्ञांचा इशारा, स्टॉक रेटिंग अपडेट - NSE: YESBANK Post Office Scheme | महिलांना भरघोस व्याज देणारी योजना, पहा 50,000, 100000, 150000 वर किती परतावा मिळेल Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स फोकसमध्ये, मिळेल 93 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 4 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 57 टक्क्यांपर्यंत कमाईची संधी - NSE: TATAMOTORS
x

आज राज्यात सर्वाधिक ५४९३ कोरोना रूग्णांची वाढ

Maharashtra State, Covid 19 Cases, Corona virus

मुंबई, २८ जून : कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून राज्यात एका दिवसात पहिल्यादांच बाधित झालेल्या रुग्णांची उच्चांकी नोंद झाली. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात पाच हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असून आज उच्चांकी नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोना बाधित रूग्णांचा आकडा १ लाख ६४ हजार ६२६ इतका झाला आहे. तर दोन हजार ३३० रुग्णांना दिवसभरात डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून आकडेवारी जाहीर केली.

महाराष्ट्रात राज्यात आज 5493 रुग्णांची वाढ झाली आहे. तर 2330 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यात 86,575 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या 70,607 रुग्णांवर रुग्णालयाचत उपचार सुरु आहेत. राज्याच आज 156 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. ज्यापैकी 60 मृत्यू हे मागील 48 तासातील आहेत. तर इतर 96 मृत्यू हे मागील कालावधीतील आहेत.

सध्या राज्यात मृत्यूदर 4.51 एवढा आहे. राज्यातील रिकव्हरी रेट आता 52.59 टक्क्यांवर पोहोचला आहे. 9,23,502 नमुन्यांपैकी 1,64,626 नमुने हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,70,475 लोकं होम क्वारंटाईन असून 37,350 लोकं हे संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आज मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये मुंबईतील 64, ठाण्यातील 24, जळगावमधील 6, जालन्यातील 1 आणि अमरावतीमधील एका रुग्णाचा समावेश आहे.

 

News English Summary: The current count of COVID19 patients in the state of Maharashtra is 164626. Today,newly 5493 patients have been identified as positive.Also newly 2330 patients have been cured today,totally 86575 patients are cured & discharged from the hospitals Total Active patients are 70607.

News English Title: Maharashtra State Records 5493 New Covid 19 Cases News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x