23 December 2024 4:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

राज्यात कडक निर्बंधांची नियमावली जारी | आज रात्री ८ पासून लागू होणार नियम

Maharashtra corona pandemic

मुंबई, २२ एप्रिल: राज्यात कोरोना रूग्ण संख्या सातत्याने वाढत असल्याने लॉकडाऊन जारी करणार असल्याचे संकेत काल झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीनंतर मंत्र्यांनी दिले होते. त्यानंतर काल (२१ एप्रिल) सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे.

आज (२२ एप्रिल) रात्री ८ वाजल्यापासून महाराष्ट्रात ब्रेक द चेनच्या माध्यमातून आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ब्रेक द चेन च्या कडक निर्बंधाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. कडक निर्बंध १ मेपर्यंत असणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचे या आधी संकेत दिले होते. आज त्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

काय आहे नवी नियमावली?

  • मुंबई लोकल आणि मेट्रो सामान्य लोकांसाठी बंद, केवळ अत्यावशक सेवेतील लोकांनाच परवानगी
  • मोनो प्रवास पूर्णपणे बंद
  • लग्न समारंभात नियंमांचं उल्लंघन केल्यास 50 हजार दंड
  • लग्नात फक्त 25 लोकांना परवानगी. एकाच हॅालमध्ये 2 तास कार्यक्रम
  • आंतरजिल्हा प्रवास फक्त महत्त्वाच्या कारणांसाठी
  • जिल्हा बंदीचा निर्णय जाहीर
  • खासगी गाडीत प्रवास 50 टक्के क्षमतेने
  • सरकारी कार्यालय 15 टक्के क्षमतेने
  • खासगी बसेस 50 टक्के क्षमतेने
  • बाहेरून येणाऱ्या लोकांना १४ दिवस Quarantine व्हावे लागणार

राज्यातील ऑफिसेसबाबत नवे नियम काय सांगतात?

1. सर्व सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 15 टक्के कर्मचारी हजर राहू शकणार. यात केवळ कोरोना नियंत्रणातील अत्यावश्यक सेवेला सूट असेल.

2. इतर सर्व कार्यालयांमध्ये 5 कर्मचारी किंवा 15 टक्के कर्मचाऱ्यांनाच हजर राहता येणार.

3. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार. मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी 100 टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार.

दरम्यान, गेल्या 24 तासांत राज्यात 568 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात तब्बल 67 हजार 468 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आज 54 हजार 985 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. आजच्या आकडेवारीनुसार राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 40 लाख 27 हजार 827 वर पोहोचला आहे. त्यातील 32 लाख 68 हजार 449 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत 61 हजार 911 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

News English Summary: The ministers had hinted after a cabinet meeting yesterday that the lockdown would be issued as the number of corona patients in the state continues to rise. Since then, yesterday (April 21) the government has announced new regulations over state corona pandemic.

News English Title: Maharashtra state will implement strict lockdown from today due to corona pandemic news updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x