22 November 2024 2:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

आज राज्यात ५०३ रूग्णांचा मृत्यू तर ६८ हजार ६३१ करोनाबाधित वाढले

Maharashtra corona pandemic

मुंबई, १८ एप्रिल: आज दिवसभरात राज्यात ६८ हजार ६३१ करोनाबाधित वाढले असून, ५०३ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.५८ टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत ६० हजार ४७३ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, राज्यात आज रोजी एकूण ६,७०,३८८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, आज ४५ हजार ६५४ रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३१,०६,८२८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८०.९२ टक्के एवढे झाले आहे.

दुसरीकडे जागतिक स्तरावर बोलायचे झाल्यास इटलीत कोरोना संसर्गाची स्थिती सुधारत आहे. २६ एप्रिलपासून देशातील अनेक ठिकाणी लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली जाणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. परंतु त्यासाठी जनतेने कोरोना प्रतिबंधक नियमांचे कडक पालन केले पाहिजे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूबाबतीत इटलीचा सातवा क्रमांक लागतो. इटलीचे पंतप्रधान मारियो ड्राघी म्हणाले, संसर्गाच्या बाबतीत देशातील परिस्थितीत सकारात्मक बदल होत आहे. त्यामुळे सरकारने नियमांत शिथिलता आणण्याचे ठरवले आहे. इटलीत २६ एप्रिलपासून संसर्ग कमी असलेल्या भागापासून लॉकडाऊन कमी केला जाणार आहे. या भागांमध्ये रेस्तराँ, सिनेमा सुरू केेले जातील.

 

News English Summary: Today, 68,631 crore cases have been reported in the state and 503 patients have died. At present, the death rate in the state is 1.58 per cent. Till date, 60 thousand 473 patients have died in the state. So, there are a total of 670,388 active patients in the state today.

News English Title: Maharashtra Today 68631 crore cases have been reported in the state and 503 patients have died news updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x