29 January 2025 4:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Mutual Fund | 500 रुपयांची SIP केल्यानंतर 5, 10, 20, 25 आणि 30 वर्षांमध्ये किती परतावा मिळणार, रक्कम जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपया 88 पैशाचा पेनी स्टॉक श्रीमंत करणार, कंपनीच्या नफ्यात 10,000 टक्क्यांनी वाढ, खरेदीला गर्दी - BOM: 542724 IRFC Share Price | रेल्वे स्टॉक फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, होईल मजबूत कमाई - NSE: IRFC Trident Share Price | 28 रुपयांच्या ट्रायडेंट शेअरमध्ये तेजीचे संकेत, शेअर 1 वर्षात 35 टक्क्यांनी घसरला - NSE: TRIDENT BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीने परतावा देणार डिफेन्स कंपनी शेअर - NSE: BEL Salary Account | तुमचे सॅलरी अकाउंट आहे का, अनेकांना सॅलरी अकाउंटविषयी 'या' महत्त्वाच्या गोष्टी ठाऊक नाहीत Tata Power Share Price | टाटा ग्रुपचा 'पॉवर' शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATAPOWER
x

सेना-भाजप युतीचं जागावाटप आज ठरणार? भाजपची दिल्लीत महत्वाची बैठक

Shivsena, BJP, Maharashtra Vidhansabha Election 2019, Maharashtra Assembly Election 2019

मुंबई: काही दिवसांवर येऊ ठेपलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील भाजपाच्या उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक रविवार, २९ सप्टेंबर रोजी दिल्लीत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल व त्यात शिवसेनेशी युतीबाबतची भूमिकाही याच बैठकीत निश्चित केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. शिवसेनेबरोबरच्या जागावाटपावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात येईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नुकतीच दिल्लीत महाराष्ट्रातील जागा व उमेदवारांबाबत चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यावेळी परदेशात असल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले नव्हते. मोदी हे शनिवारी रात्री परदेश दौऱ्यावरून भारतात परतले आहेत. त्यामुळे रविवारी भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. महाराष्ट्रातील भाजपाचे उमेदवार व युतीच्या जागावाटपावर त्यावेळी अंतिम निर्णय घेण्यात येईल. मोदी यांच्याबरोबरच अमित शाह, जे. पी. नड्डा, महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आदी ज्येष्ठ नेते या बैठकीत सहभागी होतील, असे सांगण्यात आले.

राज्यात विधानसभा निवडणुकीचं रण तापलं आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अद्याप भाजप-शिवसेना युती जागावाटपावर अडलेली आहे. दिल्लीत आज भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. त्यात भाजपची युतीबाबतची भूमिका स्पष्ट होईल. शिवसेनेसोबतच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे, असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रासह हरयाणातील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या यादीवर अंतिम निर्णय होईल, असंही सांगण्यात आलं.

दरम्यान, भाजपनं निवडून येण्याची दाट शक्यता असलेल्या उमेदवारांची यादी तयार केली आहे. याशिवाय मतदारसंघातील स्पर्धेत असलेल्या उमेदवारांची एक यादी तयार केली आहे. या दोन्ही याद्यांवर बैठकीत चर्चा होणार आहे. त्यानंतर अंतिम यादीवर शिक्कामोर्तब करण्यात येईल. याशिवाय युतीच्या जागावाटपाबाबतही निर्णय होणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x