24 November 2024 5:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी राज्यपालांची केंद्रीय गृहमंत्रालयाकडे शिफारस: दूरदर्शनचं वृत्त

NCP, Congress, Shivsena, BJP, President Rules in Maharashtra

मुंबई: राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली आहे. राज्यपालांनी भारतीय जनता पक्ष, शिवसेनेला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं होतं हे दोन्ही पक्ष सरकार बनविण्यात असमर्थ ठरले असून राज्यपालांनी राष्ट्रवादीला निमंत्रण दिलं होतं. मात्र राष्ट्रवादी शिवसेनेच्या पाठिंब्यावर अवलंबून असल्याचं दिसून येत असल्याने राज्यपालांनी कायदेशीर सल्ला घेत केंद्रीय गृहमंत्रालयाला ही शिफारस पाठविली असल्याची माहिती सरकारी वृत्तवाहिनी दूरदर्शन आणि एएनआय’ने दिली आहे.

दिल्लीतही घडामोडींना वेग आला आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेटची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महाराष्ट्रात जो राजकीय पेच निर्माण झाला आहे त्याची चर्चा होऊ शकते. त्यामुळे दिल्लीत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ब्रिक्स समिटसाठी ब्राझिलला जाणार आहेत. मात्र त्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेटची बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तत्पूर्वी, राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सोडविण्यासाठी सोनिया गांधींचे निकटवर्तीय अहमद पटेल, के. सी वेणुगोपाळ आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे मुंबईसाठी रवाना झालेले आहेत. राष्ट्रवादीला राज्यपालांनी दिलेल्या सत्तास्थापनेच्या निमंत्रणानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. आज सकाळी शरद पवार यांची सोनिया गांधी यांच्यासोबत फोनवरुन चर्चा झाली असल्याची माहिती के. सी वेणुगोपाळ यांनी दिली.

दरम्यान महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांनी सत्ता स्थापनेसंबंधी महत्वपूर्ण विधान केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निवडणूकपूर्व आघाडी झाली होती. आमची राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर चर्चा सुरु आहे. आम्ही अंतिम निर्णय एकमताने घेऊ. राष्ट्रवादी बरोबर चर्चा झाल्यानंतरच पुढची भूमिका जाहीर करु असे मल्लिकार्जून खर्गे म्हणाले.

सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मतभेद असल्याचं उघड झालं असतानाच, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी फोनवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी आज सकाळी चर्चा केली. पुढील चर्चेसाठी सोनिया गांधी यांनी अहमद पटेल, ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि माझी नेमणूक केली आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाळ यांनी दिली. आता हे तिघेही मुंबईला रवाना होणार आहेत. ते शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळं राज्यातील सत्तापेच सुटणार का? याबाबत उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x