15 November 2024 4:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GMP IPO | स्वस्त IPO आला रे, मजबूत कमाईची मोठी संधी, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

फडणवीसांच्या काळात महिलांवरील सायबर गुन्ह्यांमध्ये राज्य देशात दुसर्‍या क्रमांकावर होतं - NCRB

Maharashtra, woman stalked, social media, NCRB Data

मुंबई, १० ऑक्टोबर : महाराष्ट्रातील महिलांवरील गुन्ह्यांबाबत नुकताच एक अहवाल नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो म्हणजेच राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (NCRB) जाहीर केला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात महिलांसह सलग तीन वर्षांत सर्वाधिक सायबर स्टॉकिंग / धमकावण्याच्या घटनांची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. ही आकडेवारी खूपच धक्कादायक आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, २०१७ ते २०१९ या काळात महाराष्ट्रात २०५१ सायबरस्टॉकिंग / धमकावण्याचे प्रकरणे नोंदवली गेली आहेत. जी संपूर्ण देशभरात नोंदविलेल्या एकूण घटनांपैकी एक तृतीयांश आहे. आंध्र प्रदेश १८४ प्रकरणांसह दुसर्‍या आणि हरियाणा ९७ प्रकरणे, म्हणजेच तिसऱ्या क्रमांकावर आहे.

२०१९ मध्ये महिलांविरुद्ध झालेल्या सायबर गुन्ह्यांच्या आकडेवारीनुसार, देशात कर्नाटक पहिल्या क्रमांकावर आहे. २०१९ मध्ये झालेल्या सायबर गुन्ह्यांच्या आकडेवारीनुसार, देशात कर्नाटक पहिल्या क्रमांकावर आहे. कर्नाटकमध्ये ५० टक्के गुन्ह्यांत वाढ होत २,६९८ इतके गुन्हे २०१९ मध्ये नोंदवले गेले आहेत. तर महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात २०१९ मध्ये १,५०३ गुन्ह्यांची नोंद झाली होती. राज्यात २०१८ साली १२६२ गुन्ह्यांची नोंद झाली होती. म्हणजेच २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये राज्यातील या गुन्ह्यांच्या संख्येत १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

महाराष्ट्रातील सायबर गुन्ह्यांवरील शिक्षा/दंड फारच कमी आहे. तर अटक केलेल्या ४,५०० हून अधिक गुन्हेगारांपैकी केवळ ५६ जणांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. महिलांना अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा अहवाल देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करीत राज्याचे पोलिस अधीक्षक बलसिंग राजपूत हे टाइम्स ऑफ इंडियाला म्हणाले, “महिला आमच्या Cybercrime.Gov.In या वेबसाईटवर थेट गुन्हे नोंदवू शकतात.”

 

News English Summary: As per the latest data released by National Crime Records Bureau, Maharashtra reported the highest number of cases of cyberstalking/bullying of women for three years in a row – 1,126. According to a report in The Times of India, Maharashtra also accounts for one-third of the total 2,051 cyberstalking/bullying cases reported across India from 2017 to 2019. Andhra Pradesh comes a distant second with 184 cases and Haryana third with 97 cases.

News English Title: Maharashtra woman stalked on social media everyday as per NCRB report Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x