15 November 2024 6:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Account Alert | तुम्हाला सेविंग अकाउंटवर FD प्रमाणे व्याज मिळेल, बँकेत जाऊन करा केवळ एक काम, पैशाने पैसा वाढवा Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, करोडपती करत आहेत या म्युच्युअल फंड योजना, बक्कळ कमाई होऊन पैसा वाढेल - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA GMP IPO | स्वस्त IPO आला रे, मजबूत कमाईची मोठी संधी, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - IPO GMP NHPC Share Price | मल्टिबॅगर NHPC शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON
x

महाराष्ट्रात आज ३४२७ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ - आरोग्य मंत्री

Maharashtra, Covid 19, Corona Virus

मुंबई, १३ जून: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून आज सलग तिसऱ्या दिवशी राज्यात ३ हजाराहून जास्त कोरोना रुग्ण सापडले आहेत. आज दिवसभरात राज्यात ३ हजार ४२७ नवे रुग्ण सापडले असून आता एकूण रुग्णसंख्या १ लाख ४ हजार ५६८ झाली आहे. यापैकी ५१ हजार ३७९ रुग्ण अॅक्टिव्ह असून ४९ हजार ३४६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, चिंतेची बाब म्हणजे आज राज्यात ११३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आता एकूण मृतांचा आकडा ३ हजार ८३० इतका झाला आहे. त्यामुळे लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यापासून वाढत असलेल्या रुग्णसंख्येला आवर कसा घालायचा? असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.

आज मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांपैकी मुंबईत सर्वाधिक ६९ जण दगावले आहेत. त्यानंतर पुण्यात १० जणांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत ८, सोलापुरात ८, पनवेलमध्ये ६ ठाण्यात ३, औरंगाबादमध्ये ३, लातूरमध्ये २ तर कल्याण-डोंबिवलीत सातारा, नांदेड आणि यवतमाळ येथे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, लॉकडाउनमध्ये शिथिलता दिल्यानंतर रुग्णांची ही मोठी संख्या समोर येत आहे. त्यामुळे या रुग्णसंख्येला नियंत्रणात आणण्याचं मोठं आव्हान आरोग्य यंत्रणेवर आहे.

११३ मृत्यूंमध्ये ७३ पुरुष तर ४० महिला रुग्णांचा समावेश होता. ११३ मृत्यूंपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील वयाचे ६५ रुग्ण होते. तर ३८ रुग्णांचे वय ४० ते ५९ वयोगटातले होते. १० रुग्णांचे वय ४० वर्षांखालील होते. ११३ पैकी १० रुग्णांच्या अतिजोखमीच्या आजारांबद्दल माहिती मिळालेली नाही. उर्वरित १०३ रुग्णांमधल्या ८३ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग असे जोखमीचे आजार आढळले. तसंच २४ तासांमध्ये एकूण मृत्यूंपैकी ७३ मृत्यू मागील दोन दिवसांमधले आहेत. तर उर्वरित मृत्यू २७ मे ते १० मे जून या कालावधीतले आहेत.

 

News English Summary: The incidence of corona is increasing in the state and today, for the third day in a row, more than 3,000 corona patients have been found in the state. Today, 3 thousand 427 new patients have been found in the state and now the total number of patients has reached 1 lakh 4 thousand 568.

News English Title: Maharastra Reports 3427 New Cases Of Covid19 And 113 Deaths Taking The Total Number Of Cases To 104568 Death Toll To 3830 News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x