23 February 2025 8:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक | गणेश नाईकांविरोधात महाविकास आघाडी एकत्र

Mahavikas Aghadi, Ganesh Naik, Navi Mumbai Municipal election

मुंबई, १७ जानेवारी: भारतीय जनता पक्षाचे नेते गणेश नाईक यांच्या नवी मुंबईतील साम्राज्याला हादरा देण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे. आगामी निवडणुकीत गणेश नाईक यांना हादरा दिल्यास त्यांचं राजकीय भविष्य देखील टांगणीला लागेल अशी शक्यता वर्तविण्यात येतं आहे. परिणामी महाविकास आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.

मागील 20 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे नेते गणेश नाईक यांचा नवी मुंबई महानगरपालिकेत वर्चस्व आहे आणि तेच मोडून काढण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे.

दरम्यान, वाशीमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने काँग्रेस नेते अस्लम शेख, राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे, आनंद परांजपे, जितेंद्र आव्हाड, शिवसेना उपनेते विजय नाहटा, माजी खासदार राजन विचारे आदी नेते या मेळाव्यात उपस्थित आहेत. या निमित्ताने विजय नाहटा यांची पर्यावरण प्राधिकरणाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याने अस्लम शेख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर महाविकास आघाडीचा नवी मुंबईतील हा पहिलाच मेळावा आहे.

 

News English Summary: It is seen that the Mahavikas Aghadi is ready to shake the empire of the third Janata Party leader Ganesh Naik in Navi Mumbai. It is being speculated that if Ganesh Naik is shaken in the upcoming elections, his political future will also be in jeopardy. As a result, the Mahavikas front has started building a strong front.

News English Title: Mahavikas Aghadi against BJP leader Ganesh Naik for Navi Mumbai Municipal election news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x