22 January 2025 6:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: JIOFIN
x

झेडपी, पंचायत समिती पोटनिवडणूक | निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकार निवडणूक आयोगाला विनंती करणार?

ZP and Panchayat Samiti By poll

मुंबई, २३ जून | OBC आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तडीस जात नाही तोवर राज्यात एकही निवडणूक होऊ देणार नसल्याची भूमिका भाजप नेत्यांसह सत्ताधारी महाविकास आघाडीतील मंत्र्यांनीही घेतला होता. या पार्श्वभूमीवर सरकारने नमती भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या राज्यातील 5 जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुका आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती पोटनिवडणुका पुढे ढकलण्याबाबत ठाकरे सरकार निवडणूक आयोगाला विनंती करणार असल्याची माहिती मिळत आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

राज्यात 5 जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समिती पोटनिवडणूक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. त्यावरुन भाजपने आक्रमक पवित्रा घेतलाय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. दुसरीकडे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार यांनीही निवडणूका नको अशी भूमिका घेतली होती. याबाबत आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्यात ही निवडणूक पुढे ढकलण्यात यावी यासाठी राज्य सरकार मुख्य सचिवांमार्फत निवडणूक आयोगाला विनंती करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Mahavikas Aghadi government may ask the Election Commission to postpone ZP and Panchayat Samiti elections news updates.

हॅशटॅग्स

#OBC(40)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x