15 November 2024 12:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS
x

महाविकास आघाडी सरकार कधीच पडणार नाही | ठाकरे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल

Mahavikas Aghadi govt, Sharad Pawar

नवी दिल्ली, ३० डिसेंबर: राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रयत्नांना कधीच यश मिळणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थिर असून ठाकरे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितलं. राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना देण्यात येणाऱ्या ईडीच्या नोटिसा म्हणजे सत्तेचा दुरुपयोग असल्याची टीकाही पवारांनी केली.

PTI या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षावर घणाघाती टीका केली. आधी त्यांना दोन महिन्यात ठाकरे सरकार पाडायचं होतं. नंतर सहा महिन्यात सरकार पाडणार होते. नंतर पुन्हा आठ महिन्यात सरकार पाडणार होते. पण काहीच झालं नाही. उलट ठाकरे सरकारने एक वर्षही पूर्ण केलं आहे. सरकार स्थिर असून आपला कार्यकालही पूर्ण करेल, असं पवार म्हणाले.

शरद पवार यांनी ईडीच्या नोटीसांवरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. ईडीमार्फत करण्यात येणारी कारवाई हा सत्तेचा दुरुपयोग आहे. ईडीने मलाही नोटीस पाठवण्याचा प्रयत्न केला होता. नंतर त्यांनी ही नोटीस परत घेतली. मी बँकेच्या बोर्डाचा सदस्य नव्हतो आणि त्या बँकेत माझं खातंही नव्हतं. राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने महिन्यात एक वर्ष पूर्ण झालं आहे. शिवसेना आणि काँग्रेस यांच्या विचारधारा भिन्न असल्याने हे सरकार पडेल असं भाजपाला वाटत होतं. परंतु तसं झालं नाही.

 

News English Summary: The Bharatiya Janata Party’s efforts to overthrow the Mahavikas Aghadi government in the state will never succeed. The government led by Chief Minister Uddhav Thackeray is stable and the Thackeray government will complete its term, said NCP’s Sarvesarva Sharad Pawar. Pawar also criticized the ED’s notices issued to ruling party leaders in the state as an abuse of power.

News English Title: Mahavikas Aghadi government will complete 5 years tenure said Sharad Pawar news updates.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x