23 February 2025 3:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity Money Alert | प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात ग्रॅच्युइटीचे 2,01,923 रुपये जमा होणार, बेसिक सॅलरी प्रमाणे रक्कम मिळेल GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार
x

सुप्रीम कोर्टाचे निर्देश केंद्र व राष्ट्रपतींकडे | मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार पत्र पाठवणार, गरज पडल्यास भेटही

Maratha reservation

मुंबई, ५ मे | मराठा समाजाने जो संयम आणि शांतता आजवर दाखवली तीच पुढेही दाखवावी, सरकारवर विश्वास ठेवावा, ही लढाई सरकार जिंकून दाखवेल, तुमचा न्यायहक्क तुम्हाला मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित केलं. यावेळी ते बोलत होते. मराठा नेत्यांनी, समाजाने शांतपणे हा निर्णय ऐकला, त्याबद्दल त्यांचे हात जोडून धन्यवाद असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजी राजे यांचा विशेष उल्लेख केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठा आरक्षण प्रकरणी जास्त वेळ न घालवता केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, आता या माध्यमातून मी विनंती करत आहे, उद्या पत्र देखील लिहिणार आहे. जर गरज असेल तर आम्ही तिथे येऊन चर्चा करण्याची तयारी आहे.

सुप्रीम कोर्टाकडुन प्राप्त निकालाच्या प्रतीचा अभ्यास विधी तज्ञांची समिती हा छोटा शब्द ठरेल, फौज त्याचा अभ्यास करत आहे. आरक्षणाचा अधिकार केंद्र आणि राष्ट्रपतींचा असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं. कलम 370 हटवताना जी हिंमत दाखवली तीच हिंमत दाखवा, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

एका प्रकारे सुप्रीम कोर्टाने हा निकाल देताना मार्गदर्शन केले आहे. यावेळी आता कुठे न्याय मिळेल हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण देण्याचा अधिकार हा केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींना असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याबाबत मी सकाळी दिलेल्या निवेदनामधून पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना आवाहन केले आहे. मात्र आता आरक्षणाच्या या मागणीसाठी मी उद्या पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना पत्र लिहिणार आहे. तसेच गरज भासल्यास आरक्षणाच्या या मुद्द्यावर मी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींचीही भेट घेईन असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

 

News English Summary: The Supreme Court has said that the right to grant reservation rests with the Central Government and the President. Therefore, now Prime Minister Narendra Modi should take the initiative and give reservation to the Maratha community. In my statement this morning, I have appealed to the Prime Minister and the President to get reservations for the Maratha community.

News English Title: MahaVikas Aghadi govt will sent request letter to PM Narendra Modi and President of India for Maratha reservation news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x