पदवीधर निवडणुकीनंतर भाजपाला मोठा धक्का देण्याची महाविकास आघाडीची तयारी

मुंबई, १७ डिसेंबर: भारतीय जनता पक्षाच्या विरोधात तिन्ही पक्ष एकत्र आले तर चांगले यश मिळू शकते याचा अंदाज तिन्ही पक्षांच्या नेत्यांना आला असून सध्याची परिस्थिती महाविकास आघाडीसाठी अनुकूल असल्याने महापालिका, नगरपालिकांची निवडणूक लवकरात लवकर घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल असे मानले जाते. राज्यातील पाच अत्यंत महत्वाच्या महापालिकांमध्ये औरंगाबाद, कोल्हापूर, नवी मुंबई, वसई-विरार आणि कल्याण-डोंबिवलीचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, पाचही महापालिकांचा कार्यकाळ आधीच संपला आहे. जवळपास १०० नगरपालिका/नगरपंचायतींचा एक तर कार्यकाळ संपला आहे किंवा संपत आहे. सर्व निवडणुका एकत्रितपणे लढण्याची महाविकास आघाडीची भूमिका आहे व ती कायम राहील.
दरम्यान, पदवीधर निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारला ‘एकीचे बळ’ लक्षात आलेले दिसत आहे. कारण भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी राज्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकाही एकत्र लढण्याची तयारी महाविकास आघाडीकडून सुरु करण्यात आली आहे असं वृत्त आहे. गावागावात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे पदवीधर निवडणुकीचंच चित्र ग्रामपंचायत निवडणुकीत पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केला तर 618 ग्रांमपंतायतींमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीच्या रुपाने एकत्र लढणार आहे. तशी माहिती महाविकास आघाडीच्या गोटातून देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी ग्रांमपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भारतीय जनता पक्ष असं चित्र पाहायला मिळालं तर अनेक गावातील राजकीय समिकरणे बदलणार हे निश्चित मानलं जात आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाचं आणि महाविकास आघाडीसाठी पोषक:
- १५ जानेवारीला १४ हजार २३२ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. त्यातील सरपंचपदाची आरक्षण सोडत ही निवडणुकीनंतर करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.
- विभागाने असा निर्णय घेतला असला तरी अंतिम निर्णय राज्य निवडणूक आयोग घेईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत म्हटले होते.
- मात्र, जाणकारांच्या मते हा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार ग्रामविकास विभागाला आहे. त्यात राज्य निवडणूक आयोगाला हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे निवडणुकीनंतर सोडतीचा ग्रामविकास विभागाचा निर्णय कायम राहील.
News English Summary: Leaders of all the three parties have predicted that if the three parties unite against the Bharatiya Janata Party (BJP), it will be a good success. The five most important Municipal Corporations in the State are Aurangabad, Kolhapur, Navi Mumbai, Vasai-Virar and Kalyan-Dombivali. A senior NCP leader said that the tenure of all the five Municipal Corporations has already ended.
News English Title: MahaVikas Aghadi may contest municipal corporation elections in alliance news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल