टाळ्या, थाळ्या वाजवून, दिवे लावून कोरोना जाण्याऐवजी वाढला - जयंत पाटील

मुंबई, २६ नोव्हेंबर: कोरोनाच्या साथीची दुसरी लाट आलेल्या युरोपला पुढच्या सहा महिन्यांत खडतर स्थितीचा सामना करावा लागेल असे जागतिक आरोग्य संघटनेच्या युरोप विभागाचे (World Health Organization) संचालक हान्स क्लूग यांनी सांगितले. नागरिकांनी नीट दक्षता न घेतल्यास साथीचे संकट आणखी गडद होऊ शकते असेही ते म्हणाले.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (Indian Council of Medical Research) माहितीनुसार देशात २४ नोव्हेंबरपर्यंत १३.४८ कोटी नमुन्यांची चाचणी कोरोनासाठी करण्यात आली होती. या चाचण्यांत मंगळवारी झालेल्या ११,५९,०३२ चाचण्यांचाही समावेश आहे. आरोग्य मंत्रालयच्या माहितीनुसार ७० टक्क्यांपेक्षा जास्त मृत्यू हे रुग्णाच्या आरोग्यातील गुंतागुंत किंवा एकापेक्षा जास्त आजारांमुळे झाले आहेत.
केंद्र सरकारने बुधवारी करोनाबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. राज्यांनी खबरदारी घेतली पाहिजे. देखरेख, कंटेन्मेंट आणि सावधगिरी बाळगताना कठोर रहावं लागेल. राज्यांना त्यांच्या परिस्थितीनुसार निर्बंध लागू करण्यास सूट देण्यात आली आहे, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे.
दरम्यान, देशातील स्थिती पुन्हा बिघडू लागल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State President Jayant Patil) भारतीय जनता पक्षाला टोला लगावला आहे. यावर भाष्य करताना जयंत पाटील म्हणाले की, “टाळी, थाळी वाजवून, दिवे लावून देशातील कोरोना जाण्याऐवजी उलट वाढला. देशाच्या पंतप्रधानांचा निर्णय म्हणून आपण जे जे केले, त्याने करोनावर नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद आणि राज्य सरकारचा निषेध करणार्या भारतीय जनता पक्षाने करोनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे,” असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला लगावला. मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ गुरूवारी शहरातील शुभमंगल कार्यालयात आयोजित पदवीधर व कार्यकर्ता जिल्हा मेळाव्यात ते बोलत होते.
News English Summary: Jayant Patil said that instead of going to Corona in the country with applause, beating of plates and lights, the opposite happened. Whatever we did as a decision of the Prime Minister of the country, he did not lose control of Karona. Therefore, the Bharatiya Janata Party (BJP), which has been protesting against the bell ringing and the state government for opening temples, should change its attitude towards Karona, said Jayant Patil, State President of the Nationalist Congress Party (NCP) and Water Resources Minister.
News English Title: MahaVikas Aghadi minister Jayant Patil criticize BJP over coronavirus pandemic numbers increased in country News updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल