5 November 2024 4:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

ऑपरेशन कमळ राज्यात शक्य नाही | आमदार फुटलाच तर त्याचं डिपॉजिट जप्त

MahaVikas Aghadi, minister Jayant Patil, BJP Operation lotus

कोल्हापूर, २१ नोव्हेंबर: महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून लवकरच महाविकास आघाडी सरकार पडणार असं वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे नेते वारंवार करत आहेत. मात्र, महाविकास आघाडी सरकारने एक वर्ष कधी पूर्ण केलं ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना देखील समजलं नसावं. त्यामुळे महाविकास आघाडीचे मंत्री वारंवार भाजपच्या ऑपरेशन लोटसची खिल्ली उडवत आहेत.

यावरून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला पुन्हा आव्हान दिलं आहे. याबाबत ते म्हणाले की, ‘जोपर्यंत सोनिया गांधी, शरद पवार आणि उध्दव ठाकरे हे एकत्र आहेत, तोपर्यंत भारतीय जनता पक्षाचे ‘ऑपरेशन कमळ’ महाराष्ट्रात शक्य होणार नाही, आमदार फुटलाच तर त्याचं डिपॉजिट जप्त होईल, त्यामुळं महाविकास आघाडीचे हे सरकार पंधरा नव्हे पंचवीस वर्षे टिकेल, असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भारतीय जनता पक्षाला लगावला, तर करोना काळातही भारतीय जनता पक्षाचे नेते राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याची टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली.

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरूण लाड व प्रा. जयंत आसगावकर यांच्या प्रचारार्थ कोल्हापुरात महाविकास आघाडीचा मेळावा झाला. यामध्ये उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी महाविकास आघाडीचे सरकार राज्यात कायम ठेवण्यासाठी शिवसेना सोबत आहे. काँग्रेसच्या नेत्यांनाही कायम सोबत ठेवा, असा टोला मारला. त्यानंतर मुश्रीफांनी हाच धागा पकडत टोलेबाजी केली.

दुसरीकडे ‘आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री ठरवू नये. भारतीय जनता पक्षाला सत्तेची स्वप्न पडत आहेत आणि त्याच स्वप्नात त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या महिला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवावा’, असा टोला नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या ”कर्तृत्ववान मराठा स्त्रिया” या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात आशिष शेलार यांनी मराठा महिला मुख्यमंत्री व्हावी असं मत व्यक्त केलं होतं. शेलारांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यानंतर परब यांनी आज शेलारांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली.

 

News English Summary: As long as Sonia Gandhi, Sharad Pawar and Uddhav Thackeray are together, BJP’s ‘Operation Lotus’ will not be possible in Maharashtra. Water Resources Minister Jayant Patil criticized Hasan Mushrif for attacking the Bharatiya Janata Party (BJP) and for trying to make a political dent in the BJP during the Corona era.

News English Title: MahaVikas Aghadi minister Jayant Patil criticize BJP over operation lotus News updates.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x