22 January 2025 6:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Rama Steel Share Price | 65 पैशाचा शेअर श्रीमंत करतोय, डिफेन्स क्षेत्रातही प्रवेश, यापूर्वी 1748% परतावा दिला - NSE: RAMASTEEL Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देतेय ही कंपनी, संधी सोडू नका, 4085 टक्के परतावा दिला शेअरने - BOM: 531771 NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
x

मंत्रिपद गेलं तरी चालेल | परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही - विजय वडेट्टीवार

MahaVikas Aghadi, minister Vijay Wadettiwar, OBC Reservation Quota, Maratha reservation

मुंबई, ५ डिसेंबर : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी घटनीपिठाची स्थापना करुन तातडीने सुनावणी करण्याच्या सरकारच्या मागणीला यश आले आहे. राज्य शासनाच्या मागणीसंदर्भात ५ सदस्यीय घटनापीठासमोर होणार्‍या सुनावणीच्या अनुषंगाने मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan, Chairman of the Cabinet Sub-Committee on Maratha Reservation) यांनी आज पाच वकिलांची समन्वय समिती त्यासाठी जाहीर केली आहे. ९ डिसेंबरला ही सुनावणी होणार आहे.

अशोक चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, या समन्वय समितीमध्ये अ‍ॅड. आशिष गायकवाड, अ‍ॅड. राजेश टेकाळे, अ‍ॅड. रमेश दुबे पाटील, अ‍ॅड. अनिल गोळेगावकर व अ‍ॅड. अभिजीत पाटील यांचा समावेश (Adv. Ashish Gaikwad, Adv. Rajesh Tekale, Adv. Ramesh Dubey Patil, Adv. Anil Golegaonkar and Adv. Including Abhijeet Patil) आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी (To demand revocation of the interim order issued by the Supreme Court regarding Maratha reservation) येत्या ९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता होणार्‍या सुनावणीच्या अनुषंगाने मराठा समाजातील नागरिक, समन्वयक, जाणकार, अभ्यासक व संघटनांना कायदेशीर स्वरूपाच्या सूचना मांडायच्या असतील तर त्यांनी समन्वय समितीतील सदस्यांशी संपर्क साधावा. ही समिती आलेल्या सूचनांचा अभ्यास करून त्याबाबत राज्य शासनाच्या वकिलांना माहिती देईल अशी माहिती देण्यात आलेली आहे.

आरक्षणाच्या प्रश्नावरून राजकीय नेत्यांकडून टोकाची विधानं केली जात असल्याचं चित्र आहे. ‘मंत्रिपद गेलं तरी चालेल परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही,’ असं वक्तव्य ओबीसी कार्यकर्ता परिषदेत काँग्रेस नेते आणि महाविकास सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार (MahaVikas Aghadi Government Minister Vijay Wadettiwar on OBC Reservation quota) यांनी केलं आहे.

मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती देण्यात आल्यानंतर राज्यात आरक्षणाबाबत नवा पेच निर्माण झाला आहे. अशातच काही मराठा संघटनांनी आमचा समावेश ओबीसींमध्ये करा, अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध ठिकाणी ओबीसी नेत्यांकडूनही बैठका घेण्यात येत आहेत. त्यातच औरंगाबादमध्ये घेण्यात आलेल्या परिषदेत विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिलासा देत म्हटलं की, ‘ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं सर्व नेत्यांचं आश्वासन आहे, मंत्रिपद गेलं तरी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही,’ असं विजय वडेट्टीवार म्हणाले. याबाबत ‘एबीपी माझा’ने वृत्त दिलं आहे.

 

News English Summary: There is a picture of extreme statements being made by political leaders on the issue of reservation. “Even if the ministry is gone, it will work, but it will not affect the OBC reservation,” said Vijay Wadettiwar, Congress leader and Minister in the Mahavikas government at the OBC workers’ conference.

News English Title: MahaVikas Aghadi minister Vijay Wadettiwar reaction on OBC and Maratha reservation News updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x