23 February 2025 10:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

मुंबई, पुणे महापालिकेत महाविकास आघाडी एकत्र? - सविस्तर वृत्त

Mahavikas Aghadi

मुंबई, २६ जून | एकीकडे प्रदेश काँग्रेस स्वबळाचा नारा देत असताना वरिष्ठ पातळीवर मात्र, भाजपला रोखण्यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीशिवाय जमणार नाही. यासाठीच काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर पुणे, मुबंई आणि अन्य महानगरपालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याबाबत खलबते सुरू आहेत. याबाबत शुक्रवारी उच्चस्तरीय बैठक झाली असून यात विधानसभा अध्यक्षपदाबाबतही चर्चा झाली.

शुक्रवारी राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी पक्षातर्फे कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत खलबते झाली. या बैठकीला पक्षाचे नेते राहुल गांधी यांचे विश्वासू आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.

या बैठकीबाबत महाराष्ट्रातील संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यात आली. तसेच स्वबळावर लढण्याची भाषा आत्तापासून योग्य नाही. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीला अद्याप अवधी असल्याने त्या विषयावर आत्तापासून चर्चा करणे योग्य नसल्याचे सांगण्यात आले. महाविकास आघाडीतील सत्तावाटपानुसार विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे होते. त्यानुसार नाना पटोले पहिले अध्यक्ष बनले होते. मात्र, त्यांनी राजीनामा देत प्रदेशाध्यक्षपद स्वीकारले होते. त्यामुळे हिवाळी अधिवेशन अध्यक्षाविना झाले. हे पद दीर्घकाळ रिकामे ठेवता येणार नाही. त्यामुळे तातडीने हे पद भरावे असे महाविकास आघाडीतील नेत्यांना वाटते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत राजभवनाला कार्यक्रम कळवावा लागतो.

मात्र, पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली असतानाही निवडणुकीबाबत सरकारने कळविलेले नाही. त्यामुळे या अधिवेशनात निवडणूक होण्याची शक्यता कमी आहे. मध्यतरी मुबंई काँग्रेसच्या कार्यक्रमात स्वबळाची भाषा केली होती. तसेच आत्तापासूनच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा समोर आणावा असा सूर आळवला होता. मात्र, या बैठकीत याबाबत नाराजी व्यक्त केली. ‘जर महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहिलो तरच मुंबई, पुणे आणि इतर महानगरपालिकांची आगामी निवडणूक भाजपला जिंकता येणार नाहीत. भाजपला रोखायचे असेल तर महाविकास आघाडीशिवाय पर्याय नाही याची केंद्रीय नेतृत्वाला याची जाणीव आहे,’ असे बैठकीबाबत माहिती देताना एका नेत्याने सांगितले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.

News Title: Mahavikas Aghadi will contest the Mumbai and Pune municipal elections together news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x