21 April 2025 6:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या HAL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक फोकसमध्ये; नुवामाने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: HAL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर्स खरेदीला गर्दी, फायदा घ्या, जबरदस्त टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA Adani Power Share Price | ग्लोबल फर्म बुलिश; अदानी पॉवर शेअर्स देईल मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: ADANIPOWER Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबद्दल महत्वाची अपडेट, ग्लोबल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
x

केंद्राला काय करायचं ते करू द्या | शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागू देणार नाही - मुख्यमंत्री

Mahavikas Aghadi

मुंबई, ०१ जुलै | शेतकरी विरोधी कोणतीही भूमिका घेऊन केंद्र सरकारने मंजूर केलेले बिल हे महाराष्ट्रात मंजूर केले जाणार नाही, महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताचाच निर्णय घेईल, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज (गुरुवारी) सय्यद पिंपरी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी त्यांनी केंद्रीय कृषी कायद्याबाबत आपले मत व्यक्त केले.

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नवीन तीन शेतकरी आणि कामगार विरोधी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी गेल्या सात महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. मात्र केंद्रातील सरकारने त्यांच्याकडे ढुंकून देखील पाहिले नाही. मात्र, केंद्राने शेतकऱ्यांच्या विरोधात जो कायदा आणला आहे, तो तसाच महाराष्ट्रात कदापि लागू केला जाणार नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन त्यामध्ये बदल केला जाईल आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी हा कायदा लागू केला जाईल. या संदर्भामध्ये अधिवेशनात चर्चा होईल, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी यावेळी बोलताना दिले.

दुसरीकडे, केंद्र सरकारला काय करायचं ते करू द्या. कोणतेही कायदे करू द्या. शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागेल अशी एकही गोष्ट महाराष्ट्रात होऊ देणार नाही. महाविकास आघाडी सरकार तुमच्यापाठी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिली.

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही ग्वाही दिली. केंद्र सरकारला काय करायचं ते करू द्या. शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागेल अशी एकही गोष्ट महाराष्ट्रात होऊ देणार नाही. महाविकास आघाडी सरकार तुमच्या हक्काचं सरकार आहे. तुमच्याच मेहनतीने राज्य, देश आणि जग चालत आहे, असं सांगतानाच शेतकरी राज्याचं वैभव आहे. आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठी आहे. अन्नदाता आणि जीवदाता एकच आहेत. आर्थिक संकट असतानाही शेतकऱ्यांना मदत करणारच, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: MahaVikas Aghadi with farmer said Chief minister Uddhav Thackeray assured news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MahaVikasAghadi(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या