22 January 2025 1:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

रायगडमध्ये वऱ्हाडाचा ट्रक २०० फूट दरीत कोसळला | चौघांचा जागीच मृत्यू

Major truck accident, Raigad, 4 dead

रायगड, ८ जानेवारी: रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात वऱ्हाडाच्या ट्रकला भीषण अपघात झाला आहे. हा ट्रक थेट 200 फूट दरीत कोसळला असून 4 जण जागीच ठार झाले आहेत, तर अंदाजे 30 ते 35 जण जखमी असल्याची माहिती आहे. मदतकार्यासाठी डॉक्टरांची टीम रवाना झाली आहे.

पोलादपूर तालुक्यातील दुर्गम कुडपण धनगरवाडी जवळील वळणावर वऱ्हाडाच्या ट्रकला हा अपघात झाला. या ट्रकमधून जवळपास 100 जण प्रवास करत असल्याचं समजते. वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रक दरीत कोसळला. या अपघाताची माहिती मिळताच महाड जवान मदतकार्यासाठी रवाना झाले आहेत.महाडची रेस्क्यू टीमही घटनास्थळाकडे रवाना झाली आहे.

दरीत कोसळलेल्या ट्रकमध्ये असलेल्यांचे प्राण वाचवण्यासाठी मदतकार्य सुरू करण्यात आल्याची माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली. खेडच्या तहसीलदारांना या अपघाताची माहिती देण्यात आली आहे. आसपास असलेल्या रक्तपेढ्यांशी आणि रुग्णालयांशी संपर्क साधण्यात आला. त्यांना मदतकार्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,’ असं चौधरी यांनी सांगितलं.

 

News English Summary: A truck belonging to Varhada has met with a tragic accident in Poladpur taluka of Raigad district. The truck crashed directly into a 200-foot ravine, killing four people on the spot and injuring about 30 to 35 others. A team of doctors has been dispatched for help.

News English Title: Major truck accident in Raigad 4 dead on the spot news updates.

हॅशटॅग्स

#Accident(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x