युतीचा निर्णय काही असो; तिकीट कापलं जाण्याच्या भीतीने सेना-भाजप इच्छुक मनसेच्या संपर्कात

मुंबई: एकेकाळी राज्यात शिवसेना मोठा भाऊ होता. त्यामुळे १७०-१८०च्या घरात जागा शिवसेना लढवत होती. आता मात्र, चित्र बरोबर उलट झाल्यामुळे शिवसेनेला अपेक्षित असलेल्या जागा भाजप सोडायला तयार नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये जागांवरून चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. मात्र, तरीदेखील त्यावर तोडगा निघू शकलेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप शिवसेनेला १२३ जागा सोडायला तयार आहे, मात्र शिवसेनेला त्याहून जास्त जागा हव्या आहेत. त्यामुळे ही दिरंगाई होत असून आज १२ वाजता अमित शहांसोबत मुख्यमंत्र्यांच्या होणाऱ्या बैठकीमध्ये यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.
पुण्यातील कोथरूड, कॅन्टोनमेंट, हडपसर हे मतदारसंघ सेनेला हवे आहेत. नाशिक येथे भाजपच्या सीमा अहेर तसेच माजी मंत्री डॉ.दौलतराव अहेर यांचे पुत्र डॉ.राहुल यांनी जिंकलेल्या मतदारसंघांवर सेनेने दावा केला आहे. धुळे शहर मतदारसंघातून अनिल गोटे यांनी भाजपला अडचणीत आणले, तो मतदारसंघ आता आम्हाला दया, असे सेना म्हणते. सोलापूर येथे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी जिंकलेला मतदारसंघ आम्हाला हवा आहे, असे सेनेचे म्हणणे आहे. आमचा पक्ष वाढवण्यासाठी आम्हाला संधी दया असे म्हणणे अयोग्य आहे काय, असा सेनेचा युक्तीवाद असून सेनेचे उमेदवार जिंकून येणे अशक्य असताना आग्रह कशाचा, असा भाजपचा प्रश्न आहे.
या वेळी भाजपने १२२ पेक्षा जास्त जागा दयायच्या तरी कशा, अशी विचारणा करत लवकर सहकाऱ्यांशी बोलून काय ते ठरवा असे सेनेला कळवले असल्याचे विश्वसनीयरित्या समजते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा मुंबईतील संभाव्य दौरा अंतिम न झाल्याने युतीची घोषणा केंव्हा या शंकेने पछाडलेल्या काही सेनानेत्यांनी मध्यस्थीसाठी भाजपशी संपर्क सुरू ठेवल्याचे समजते. आदित्य यांच्या चमूने सेनेचा लाभ भाजपसमवेत रहाण्यात असल्याचेसमजून घ्यावे यासाठी सेनेतील ज्येष्ठ मंत्री प्रयत्न करीत आहेत. निवडणूक खर्चाचा तपशील उचला असे मंत्र्यांना कळवण्यात आल्याने मंत्रीवर्गात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे जवळपास १०० ते १२० जागा लढविणार असल्याची माहिती आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या मनसेचा प्रभाव असणाऱ्या भागामध्ये मनसे संपूर्ण ताकदनिशी उतरणार आहे. या विभागातील सर्व जागा मनसेने लढविण्याचा निर्णय केला आहे. तर मराठवाडा, विदर्भ, कोकण याठिकाणच्या मोजक्या जागांवर मनसे लक्ष केंद्रीत करणार आहे. मनसेच्या इच्छुक उमेदवारांची यादी तयार करण्याचं काम सध्या सुरु आहे अशातच काही शिवसेना भाजपातील इच्छुकांनी मनसेशी संपर्क साधला असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
PBKS Vs SRH 2025 | सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्जविरुद्ध पुनरागमनाचं मोठं आव्हान, चाहत्यांचा उत्साह
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Suzlon Share Price | मार्केट क्रॅशमध्ये सुझलॉन शेअर 6.54 टक्क्यांनी घसरला, टार्गेट प्राईस अपडेट जाणून घ्या - NSE: SUZLON
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL