28 January 2025 7:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

काँग्रेसकडून लोटसचं ऑपरेशन | नगरमध्ये मोठे भाजप पदाधिकारी काँग्रेसमध्ये

BJP party workers, join congress, Minister Balasaheb Thorat

मुंबई, २२ डिसेंबर: लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान, तत्कालीन सत्ताधारी भाजप-शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांचा लोंढा होता. मात्र हा लोंढा आता उलट दिशेने वाहण्यास सुरुवात झाली आहे. चक्क भारतीय जनता पक्षामधील कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Revenue Minister Balasaheb Thorat) यांच्या उपस्थितीत नगरमधील अकोले इथं हा ‘चमत्कार’ घडला आहे. संगमनेर आणि अकोले इथल्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेब थोरात‌ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (Bharatiya Janata Party office bearers from Sangamner and Akole joined the Congress in the presence of minister Balasaheb Thorat)

“मागीलकाही काळात‌ लोकं गेली. पण त्यांची ‌वाट‌ चुकली, ते ‌परत‌ येत‌ आहेत. सुबह का भुला शाम को घर आये तो उसे भुला नही कहते” असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी या कार्यकर्त्यांचं स्वागत केलं. भारतीय जनता पक्षामधून मोठ्या प्रमाणात घरवापसी होणार असून भारतीय जनता पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. पक्षाला लागलेली गळती पाहून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी, भारतीय जनता पक्षातून कोणीही जाणार नाही असा खोटा दावा देवेंद्र फडणवीस यांना करावा लागत आहे, असेही थोरात म्हणाले. (Minister Balasaheb Thorat also said that Devendra Fadnavis has to make a false claim that no one will leave the Bharatiya Janata Party)

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ज्येष्ठ नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य, अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव नवले, माजी जिल्हा परिषद सदस्य, अगस्ती साखर कारखान्याचे संचालक मिनानाथ पांडे, बुवासाहेब नवले पतसंस्थेचे उपाध्यक्ष, माजी पंचायत समिती सदस्य रमेश जगताप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस मदन पथवे, सावरगावपाठचे सरपंच रमेश पवार, समशेरफट गावचे सरपंच भास्करराव दराडे, देवगण गावचे एकनाथ सहाणे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत गांधी भवन येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

 

News English Summary: During the Lok Sabha and Assembly elections, there was a flurry of people joining the then ruling BJP-Shiv Sena. But now the river is flowing in the opposite direction. BJP workers have joined the Congress. This ‘miracle’ has taken place in Akole in the presence of Congress State President Balasaheb Thorat. BJP office bearers from Sangamner and Akole joined the Congress in the presence of Balasaheb Thorat.

News English Title: Many BJP party workers join congress party in the presence of minister Balasaheb Thorat news updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x