8 January 2025 11:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा इशारा, महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: SUZLON Yes Bank Share Price | येस बँक शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: YESBANK Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो शेअर्स नको, या फंडात मल्टिबॅगर परतावा मिळेल, 130 टक्क्याने कमाई करा SBI Mutual Fund | बिनधास्त महिना बचत करा SBI फंडाच्या या योजनेत, SIP वर मिळेल 1 कोटी 22 लाख रुपये परतावा EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या Mahindra XUV400 EV | 'या' इलेक्ट्रिक कारच्या किंमतीने वेधले अनेकांचे लक्ष, पॉवरट्रेन आणि इंजिन, इलेक्ट्रिक कारचे फीचर्स
x

भाजपामध्ये भूकंप? | १४ झेडपी सदस्य, ३५ पंचायत समिती सदस्य, ४० नगरसेवक, १६ बाजार समिती सदस्य, ११ मंडळ अध्यक्षांचे राजीनामे

Pankaja Munde

मुंबई, १३ जुलै | बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात डावलण्यात आल्याने बीड जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून भाजपच्या पंचायत समिती सदस्यांपासून नगरसेवकांपर्यंत पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्त्र सुरू केले आहे. दरम्यान, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे सोमवारपर्यंत १५० राजीनामे आले असून ते मुंबईला गेले आहेत.

भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये डावलण्यात आल्याने बीड जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू केले आहे. मागील तीन दिवसांच्या काळात जिल्ह्यात १४ जिल्हा परिषद सदस्य, ३५ पंचायत समिती सदस्य, ४० नगरसेवक, १६ बाजार समिती सदस्य, बीड जिल्ह्यातील भाजपचे अकरा मंडळ अध्यक्ष या शिवाय शिरूर पंचायत समिती उपसभापतींसह केज, पाटोदा आणि गेवराई येथील पंचायत समितीच्या सभापतींनी आपल्या पदांचे राजीनामे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.

पंकजा यांच्याशी चर्चा करणार:
प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत होते मी, डॉ. प्रीतम मुंडे या मंत्री व्हाव्यात परंतु कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. यावर पंकजांनी प्रत्येकाला संयमाचे आवाहन केले आहे. सध्या कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. जिल्ह्यातील १५० पदाधिकाऱ्यांचे राजीनामे स्वीकारले असून आजच्या बैठकीत आमच्या नेत्या पंकजा मुंडे
यांच्याशी चर्चा करणार आहेत अशी माहिती राजेंद्र मस्के यांनी दिली आहे. ​​​​​​​

वरळी कार्यालयात बैठक:
भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना मोदींच्या मंत्रिमंडळात डावलण्यात आल्याने बीडसह राज्यातील नाराज पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले असून या पार्श्वभूमीवर वरळी येथील कार्यालयात मंगळवार, १३ जुलै २०२१ रोजी दुपारी बारा वाजता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत असून या बैठकीत पंकजा मुंडे आता शिवसेनेत प्रवेशाचा निर्णय घेतात की भाजपमध्ये राहतात याकडे लक्ष लागले आहे.

जिल्हाध्यक्षांच्या पत्नीनेही दिला राजीनामा:
बीडचे भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या पत्नी जयश्री मस्के या लिंबागणेश जिल्हा परिषद गटाच्या भाजपच्या सदस्या असून त्यांनीही नाराजी व्यक्त करत राजेंद्र मस्के यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Many Pankaja Munde supporters resigned from party may panic for State BJP news updates.

हॅशटॅग्स

#Pankaja Munde(80)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x