राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती | भाजपचे दहापेक्षा जास्त आमदार नाराज - जयंत पाटील

मुंबई, १६ डिसेंबर: मागील चार महिन्यात आपल्याकडचे किती आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील, हे तुम्हाला कळणारही नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत केला. यानंतर अनेक राजकीय चर्चा सुरु झाल्या होत्या. मला त्यांना सांगणं आहे की आमच्याकडून तुमच्याकडे गेलेत ते कधी राजीनामा देतील आणि आमच्याकडे येऊन निवडून येतील ते सांगता येत नाही, त्यांच्यावर लक्ष ठेवा,’ असा टोला अजित पवारांनी काल भारतीय जनता पक्षाला लगावला होता.
त्यानंतर भारतीय जनता पक्षात दहापेक्षा जास्त आमदार नाराज असून, राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती होणार आहे, अशी माहिती राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक सदस्य चर्चा करत आहे. हाताच्या दोन्ही बोटांपेक्षा जास्त सदस्य भारतीय जनता पक्षामध्ये नाराज आहेत, उबग आलेली आहे, त्यांच्यातील बऱ्याच जणांचा राष्ट्रवादीकडे येण्याचा कल आहे. याबाबत लवकर निर्णय घेतला जाईल, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा राजकीय गोटात एकच खळबळ उडाली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीत मेगाभरती होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
दरम्यान, आज जनसुराज्य पक्षाचे नेते आणि हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजीव आवळे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते.
News English Summary: You don’t even know how many MLAs have resigned and come to us in the last four months, Deputy Chief Minister Ajit Pawar said in the Assembly on Tuesday. This was followed by several political discussions. I have to tell them that if they go to us, they will resign and come to us. I can’t tell you, keep an eye on them, ‘said Ajit Pawar to the Bharatiya Janata Party yesterday.
News English Title: Many unhappy BJP MLA will join NCP soon said minister Jayant Patil news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Loan EMI Alert | कोणत्याही प्रकारचे कर्ज घेताना 'या' महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या, नाहीतर पश्चातापाची वेळ येईल