अॅड. जयश्री पाटील यांचा बोलवता धनी जाहीर होणार - मराठा क्रांती मोर्चा

मुंबई, ६ एप्रिल: मुंबईतील बार, हुक्का पार्लर चालकांकडून दरमहा १०० कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याच्या मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्या आरोपांप्रकरणी अखेर अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी गृहमंत्र्यांवरील आरोपांची चाैकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिल्यानंतर देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा मंजूर केला.
दरम्यान, अनिल देशमुख यांनी सोमवारी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर तातडीने दिल्ली गाठली. याठिकाणी त्यांनी काँग्रेसचे नेते आणि ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांची भेट घेतली. अनिल देशमुख हे सिंघवी यांच्या घरी गेले होते. याठिकाणी अनिल देशमुख, अभिषेक मनु सिंघवी आणि वकिलांच्या एका टीममध्ये साधारण तासभर चर्चा सुरु होती. त्यामुळे अनिल देशमुख सीबीआय चौकशीच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार, असल्याचे सांगितले जाते.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात अॅड. जयश्री पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने CBI तपासाचा आदेश दिला. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाकडून संताप व्यक्त केला जात आहे. जयश्री पाटील यांनी मराठा समाजाची बदनामी केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे.
याचिकाकर्त्या अॅड. जयश्री पाटील यांनी मराठा समाजाची बदनामी केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. बदनामी केल्याप्रकरणी कारवाई करण्याचा इशाराही मराठा क्रांती मोर्चाने परिपत्रक जारी करुन दिला आहे. सुप्रीम कोर्टात निकाल लागताच अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि अॅड. जयश्री पाटील यांचा बोलवता धनी कोण, याचाही खुलासा करणार, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या विरोधात त्यांनी याचिका दाखल केल्याने आधीच वाद आहे त्यात आणखी भर पडली आहे.
News English Summary: Adv. against former Home Minister of Maharashtra Anil Deshmukh. While hearing the petition filed by Jayashree Patil, the Mumbai High Court ordered a CBI inquiry. After that, anger is being expressed by the Maratha Revolutionary Front. The Maratha Kranti Morcha has accused Jayashree Patil of defaming the Maratha community.
News English Title: Maratha Kranti Morcha has accused advocate Jayashree Patil of defaming the Maratha community news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअर 6 महिन्यात 32% घसरला, स्टॉक BUY की SELL करावा - NSE: NBCC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO