15 November 2024 8:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

राज्यांना अधिकारच नसताना भाजपने समाजाची अशी दिशाभूल केली होती | मग ते सेलिब्रेशन मतांसाठी?

Maratha reservation, Devendra Fadnavis, Ashok Chavans allegation

मुंबई, १० मार्च: देशातील राज्यांना अधिकार नसताना फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाचा कायदा करून दिशाभूल केल्याचे निवेदन आरक्षण समितीचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विधान परिषदेत केले. १५ ऑगस्ट २०१८ रोजी केंद्र सरकारने १०२ वी घटनादुरुस्ती करून कोणत्याही आरक्षणाचे अधिकार राज्य सरकारांकडून काढून घेतले असताना, त्यानंतर तीन महिन्यांनी, २९ नोव्हेंबरला फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाचा केलेेला कायदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे ते म्हणाले. अशोक चव्हाणांच्या या निवेदनावर बाजू मांडण्याची संधी मिळाली नाही म्हणून विरोधी पक्षाने सभात्याग केला.

सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकार आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात परस्परांवर आरोप‘प्रत्यारोप सुरू आहेत. ८ मार्च रोजी सुप्रीम कोर्टात याबाबत झालेल्या सुनावणीत, राज्यांना हा अधिकारच नसल्याची बाब सदर घटनादुरुस्तीचा आधार घेऊन केंद्र सरकारने मांडली. त्याची माहिती चव्हाण यांनी विधान परिषदेत दिली. मराठा आरक्षणाशी संबंधित सर्व प्रकरणांची एकत्र सुनावणी घ्यावी, देशातील सर्व राज्यांना यात सहभागी करून घ्यावे आणि इंद्रा साहनी निर्णयातून तोडगा काढण्यासाठी नऊ न्यायाधीशांचे खंडपीठ नेमावे या तीन विनंत्या राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात केल्या. मात्र, त्यांची भूमिका अमान्य करून, राज्य सरकार कमी पडल्याची भूमिका घेऊन विरोधकांनी सभात्याग केला.

खासगी पक्षांनाही बाजू मांडण्यासाठी २४ मार्चला संधी:
१५ मार्च ते २५ मार्चदरम्यान या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात होणार असून, २४ मार्च रोजी खासगी पक्षांनाही यात बाजू मांडण्याची संधी दिली आहे. त्यामुळे राज्य सरकार याबाबत व्यवस्थित बाजू मांडत नाही असे वाटत असलेल्या व्यक्ती किंवा संघटनांना त्यांच्या वकिलांमार्फत त्यांची बाजू मांडावी, असे चव्हाण म्हणाले.

 

News English Summary: Chairman of the Reservation Committee and former Chief Minister Ashok Chavan made a statement in the Legislative Council that the Fadnavis government had misled the people by enacting the Maratha Reservation Act when the states of the country did not have the authority. He said that on August 15, 2018, when the Central Government withdrew the right to any reservation from the state governments by amending the 102nd Amendment, three months later, on November 29, the Fadnavis government had found the Maratha reservation law in the midst of controversy. Opposition parties have stated they will not run in the by-elections.

News English Title: Maratha reservation law was misled by the Fadnavis government Ashok Chavans allegation news updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x