23 February 2025 2:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती
x

मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती हटवा | ठाकरे सरकारचा सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज

Maratha Reservation, Petition To Supreme Court, Lift Interim Stay, Marathi News ABP Maza

मुंबई, २१ सप्टेंबर : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे. ही स्थगिती उठवण्यासाठी ठाकरे सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात आज विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाल्याने ठाकरे सरकारवर टीका झाली होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकरच यातून मार्ग काढू असं आश्वासन दिलं. तसंच मराठा बांधवांच्या मागण्यांच्या पाठिशी आम्ही कायम आहोत असंही म्हटलं होतं. त्यानुसार आज अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानं राज्य सरकारला धक्का बसला. आता या प्रकरणात कायदेशीर लढाई देण्याची तयारी सरकारकडून सुरू आहे. एक ते दोन दिवसांत राज्य सरकार मराठा आरक्षण प्रकरणात योग्य पाऊल उचलेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. त्यानंतर आज सरकारनं सर्वोच्च न्यायालयाच्या मोठ्या खंडपीठाकडे विनंती अर्ज दाखल केला. आरक्षणाला देण्यात आलेली अंतरिम स्थगिती उठवण्याची मागणी अर्जातून करण्यात आली आहे.

तत्पूर्वी स्थगितीच्या निर्णयामुळे निर्माण झालेला तिढा सोडवण्याच्या दृष्टीने विरोधी पक्षांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागच्या बुधवारी बैठक घेतली होती. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहनमंत्री अनिल परब शेकापचे जयंत पाटील उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका सगळ्याच पक्षांनी घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत समाधानही व्यक्त केलं. दरम्यान आज अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करण्यात आला आहे.

 

News English Summary: The Supreme Court has given an interim stay to the Maratha reservation. The Thackeray government has filed a petition in the Supreme Court today seeking lifting of the stay. The Thackeray government was criticized for getting an interim moratorium on Maratha reservation. However, Chief Minister Uddhav Thackeray promised to find a way out of this soon.

News English Title: Maratha Reservation Petition To Supreme Court To Lift Interim Stay By Maharashtra Government Marathi News LIVE latest updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x