10 January 2025 6:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर गुंतवणूकदारांना नुकसान, नवीन अपडेटचा स्टॉक प्राईसवर परिणाम होणार - NSE: RELIANCE IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IRB NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांकडून इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | वेदांता शेअर उच्चांकी पातळीवरून 18 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून स्टॉकबाबत महत्वाचे संकेत - NSE: VEDL Credit Score | खराब क्रेडिट स्कोर असेल तरी सुद्धा मिळेल पर्सनल लोन; आता तुमचे काम रखडणार नाही, कसं समजून घ्या Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH
x

मोठी जवाबदारी | सारथीसह मराठा समाजाशी संबंधित योजनांचा कारभार अखेर उपमुख्यमंत्र्यांकडे

Maratha reservation, Sarathi Santha, Deputy Chief Minister Ajit Pawar, Marathi News ABP Maza

मुंबई, १७ सप्टेंबर : राज्य सरकारने आज जीआर जारी करत सारथी संस्थेसह मराठा समाजाच्या योजना राबवण्याची जबाबदारी अजित पवार यांच्याकडील नियोजन विभागाकडे वर्ग केली आहे. सारथी संस्था आणि मराठा समाजाशी संबंधित योजनांची जबाबदारी काँग्रेसचे मंत्री विजय वड्डेटीवार यांच्या बहुजन कल्याण विभागाकडे होती. मात्र ओबीसी समाजाचे असलेले विजय वड्डेटीवार मराठा समाजाला न्याय देत नसल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून होत होता. या आरोपांनी व्यथित झालेल्या वड्डेटीवार यांनी सारथीची जबाबदारी अजित पवारांनी स्वीकारावी अशी त्यांना विनंती केली होती.

मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानं समाजात अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर पुढील न्यायालयीन लढाईची दिशा ठरवण्यासाठी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्वपक्षीय नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. यानंतर आता ठाकरे सरकारनं मराठा समाजाच्या दृष्टीनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे.

मराठा समाजासाठी अनेक योजना राबवण्याचं काम सारथी संस्था करते. ठाकरे सरकारनं ही संस्था कमकुवत केल्याचा आरोप विरोधकांनी अनेकदा केला आहे. सारथी संस्थेचं कामकाज बहुजन कल्याण विभागाकडे होतं. हा विभाग काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या मदत आणि पुनर्विकास मंत्रालयाकडे येतो. मराठा समाजाकडून वडेट्टीवार यांच्यावर अनेकदा टीका झाली. त्यामुळे सारथी संस्थेचा कारभार दुसऱ्या मंत्र्याकडे सोपवण्यात यावा, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.

 

News English Summary: The state government today issued a GR and handed over the responsibility of implementing the plans of the Maratha community to the planning department under Ajit Pawar. Congress Minister Vijay Vaddetiwar’s Bahujan Welfare Department was responsible for schemes related to the Sarathi Sanstha and the Maratha community.

News English Title: Maratha reservation Sarathi Santha will work under deputy Chief Minister Ajit Pawar Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x