मराठा आरक्षणावरून आता मूक मोर्चे नाही | संघर्ष अटळ | आ. नितेश राणे आक्रमक
मुंबई, १० सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात वर्षा या शासकीय निवासस्थानी काल बैठक पार पडली. दोघांमध्ये सुमारे पाऊण तास झाली बैठक झाली. मराठा आरक्षणासंदर्भात आलेल्या निर्णयावर चर्चा झाली.
सुप्रीम कोर्टाचा मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय आल्यानंतर काल बुधवारी सायंकाळी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मराठा आरक्षणासंदर्भात बैठक झाली.
दरम्यान, या विषयाला अनुसरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी थेट सरकारला इशारा देत म्हटलं आहे की, या सरकारनी मराठयांचा विश्वासघात केला, आज आमच्या समाजाच भविष्य अंधारात गेले. कुठल्या तोंडाने या सरकारच्या मंत्र्यांना राज्यात फिरायला द्याच कशासाठी? आता मूक मोर्चे नाहीच. आता संघर्ष अटळ आहे असा इशारा त्यांनी ठाकरे सरकारला ट्विटच्या माध्यमातून दिला आहे.
या सरकारनी मराठयांचा विश्वासघात केला!!
आज आमच्या समाजाच भविष्य अंधारात गेले..
कुठल्या तोंडानी या सरकारच्या मंत्र्यांना राज्यात फिरायला द्याच..कश्यासाठी??
आता मूक मोर्चे नाहीच..
आता संघर्ष अटळ आहे!!— nitesh rane (@NiteshNRane) September 10, 2020
तत्पूर्वी, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी परखड प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,”आज मराठा समाजावर अन्याय झाला! आम्ही राज्यघटनेचा आणि न्याय व्यवस्थेचा आदर करतो. मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी प्रचंड मोठा त्याग केला आहे. अनेकांनी स्वतःच्या आयुष्याची होळी केली, हजारो लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. या राष्ट्राच्या एकेक इंच जमिनीचे रक्षण करण्याकरिता, इथल्या संस्कृतीचे रक्षण करण्याकरिता सर्वात जास्त त्याग करणारा हा समाज आहे. त्या राष्ट्रभक्त समाजाला स्वतंत्र भारतात डावलले जात असल्याची भावना निर्माण होत आहे. राज्यघटनेच्या चौकटीत मराठा समाजालाही समतेची वागणूक मिळावी अशी अपेक्षा आहे.”
News English Summary: This government betrayed the Marathas, today the future of our society is in the dark. Why let the ministers of this government walk around the state with any mouth? No more silent rallies. He has warned the Thackeray government through a tweet that now the conflict is inevitable said BJP MLA Nitesh Rane.
News English Title: Maratha Reservation Supreme Court Why should ministers be allowed to roam in state said BJP MLA Nitesh Rane Marathi News LIVE latest updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार