28 January 2025 7:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

रेकॉर्डवर सांगतोय | मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही - मुख्यमंत्री

Maratha Reservation, community reservation, OBC Reservation, CM Uddhav Thackeray

मुंबई, १५ डिसेंबर: मराठा आरक्षण लढाई अंतिम टप्प्यात आहे, ही लढाई आम्ही जिंकणारच, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) म्हणाले. रेकॉर्डवर सांगतोय, मराठा आरक्षण देताना इतरांना धक्का लावणार नाही, असंही मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं. ते विधानसभेत बोलत होते.

विरोधकांच्या सर्वच आरोपांना उत्तर देण्याची गरज वाटत नाही, माझ्या सहकारी मंत्र्यांनी उत्तर दिलं आहे, तुम्ही मानगुटीवरच बसायचा प्रयत्न करत असाल तर आम्ही काहीही करू शकणार नाही, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. फडणवीस दिल्लीत जावेत ही तर मुनगंटीवारांची इच्छा, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. मेट्रो प्रकल्पात मिठागराचा खडा न टाकण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

‘माझ्या सहकारी मंत्र्यांनी समर्पक उत्तर दिलंय, आता तुम्ही आमच्या मानगुटीवर बसायचं ठरवलं असेल तर माहित नाही. सर्वानुमते ही लढाई आपण तिथे लढतोय, ही लढाई जिंकल्याशिवाय आपण राहणार नाही, ही लढाई जिंकावी अशी माझी प्रार्थना आहे. वेळोवेळी संघटनांबरोबर चर्चा चालू असते, अशोक चव्हाण तर अनेक वेळा वकीलांबरोबर चर्चा करतात. ही लढाई सुरू असताना मध्येच कुणाच्या सडक्या डोक्यातून निघालं माहित नाही. मराठा समाजाला त्यांचे न्याय हक्क मिळवून देताना दुसऱ्या समाजाचे आम्ही एक कणही काढणार नाही.’ असं ही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, ‘ज्या कोणी समाजविघातक शक्ती जातीपातीत संघर्ष आग लावण्याचा प्रयत्न करत असतील तर त्या आगीवर पाणी टाकावं लागले. आपण टाकलं नाही तर राज्यातील जनता पाणी टाकेल. विरोधी पक्षांनी आमचं पुस्तक वाचन केलं. आधी कुंडल्या बघत होत्या, कुंडल्या बघणारे आता पुस्तक वाचायला लागले आनंद आहे. मुहुर्त बघत होते आज पडणार उद्या पडणार. कुंडल्या कुणी कुणाच्या बदलू शकत नाही. हे अधिवेशन दोन दिवसांचं घ्यावं लागले. दोन दिवस का घ्यावं लागलं तर कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे काळजी घेण्याची आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केलं.

 

News English Summary: The battle for Maratha reservation is in its final stage, we will win this battle, said Chief Minister Uddhav Thackeray. Saying on record, while giving Maratha reservation, he will not push others, the Chief Minister also underlined. He was speaking in the Assembly.

News English Title: Maratha Reservation will not other community reservation said CM Uddhav Thackeray in state assembly news updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x