6 November 2024 2:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

देशात विद्यार्थ्यांची डोकी फुटत असतील तर शांत बसणार नाही: फ्रान्सिस दिब्रेटो

JNU Violence, Osmanabad Marathi Sahitya Sammelan, Francis Dibrito

उस्मानाबाद: देशातील ढासळत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीविरोधात मराठी साहित्यिकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून शुक्रवारी एल्गार पुकारला. धर्मांध वातावरण, वाढती असहिष्णुता, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच, गोहत्येच्या संशयावरून अल्पसंख्याकांचे घेतले जाणारे सामूहिक बळी (मॉब लिंचिंग), विरोधी मत मांडणाऱ्यांना देशद्रोही ठरवणे आणि जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना झालेली अमानुष मारहाण या सर्व प्रकारांविरोधात सारस्वतांनी ताशेरे ओढून देशातील परिस्थितीवर हल्ला चढवला. ‘देशाला वेठीस धरले जात आहे,’ अशी सडकून टीका साहित्यिकांनी केली.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची डोकी फुटत असतील तर आम्ही मुळीच शांत बसणार नाही. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना मारहाण करणं हे कोणत्या संस्कृतीत बसतं? तसंच दाभोलकर, गौरी लंकेश यांना ठार करण्यात आलं ही कोणती भारतीय संस्कृती आहे? असे प्रश्न उपस्थित करत ९३ व्या अखिल भारतीय संमेलानाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांनी आपल्या भाषणात सद्यस्थितीवर भाष्य केलं आणि मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं.

अध्यक्षीय भाषणात फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संविधानातील मूल्यांची पायमल्ली, पर्यावरणाचा ऱ्हास, मातृभाषेतून शिक्षण, प्रकाशन व्यवसाय अशा अनेक मुद्यांना स्पर्श केला. तरुणांना काही काळ फसवता येईल, त्यांची दिशाभूल करता येईल. मात्र, ही धुंदीही हळूहळू उतरते. दुसऱ्यांच्या द्वेषावर आपले जीवन, राजकारण अवलंबून असते तेव्हा जीवनाला काहीच अर्थ उरत नाही. सध्या देशासमोर आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पर्यावरणाचा ºहास हे प्रश्न आहेत. प्रगती करताना मूल्यांचा विसर पडता कामा नये, याकडे दिब्रिटो यांनी लक्ष वेधले.

“मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणार असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. उद्धव ठाकरे हे मराठी भाषेचा आग्रह धरणारे आहेत. त्यांना सांगा हे आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करा. अन्यथा ही मंडळी तुमचं ऐकणार नाहीत.” असंही संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांनी स्पष्ट केलं.

 

Web Title:  Marathi Sahitya Sammelan Chief Francis Dibrito slams PM Narendra Modi government over JNU violence.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x