21 December 2024 9:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: NTPCGREEN IPO Watch | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, मजबूत कमाईची संधी - IPO GMP Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN Penny Stocks | 4 रुपयाचा पेनी शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, कंपनीबाबत अपडेट, मोठी कमाई होईल - Vikas Lifecare Share Price Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: TATAMOTORS
x

प्रसिद्ध गायिका वैशाली माडेचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश | विदर्भ विभागाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती

Singer Vaishali Made

मुंबई, ०३ जून |  प्रसिद्ध गायिका वैशाली माडेनं नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेता अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, मंत्री धनंजय मुंडे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित वैशालीने पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीट करत वैशालीचं अभिनंदन केलं आहे.

वैशाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. मात्र सध्या महाराष्ट्रात कोरोना महामारीने थैमान घातला आहे. ही परिस्थिती बघून, वैशालीचा प्रवेश पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आज ही प्रतीक्षा संपली आहे. आज वैशालीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अखेर प्रवेश केला आहे. वैशालीचा राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागात प्रवेश झाला आहे. तसेच तिची विदर्भ विभागाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.

वैशालीच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशानंतर पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी तिचं स्वागत केलं आहे. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा ट्वीट करत वैशालीला शुभेच्छा दिल्या आहेत. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात वैशालीला पक्षात प्रवेश देण्यात आला आहे.

 

News English Summary: Famous singer Vaishali Made has recently joined the NCP. Vaishali has joined the party in the presence of Deputy Chief Minister and NCP leader Ajit Pawar, MP Supriya Sule, Minister Dhananjay Munde and other office bearers. Deputy Chief Minister Ajit Pawar has congratulated Vaishali by tweeting.

News English Title: Marathi Singer Vaishali Made join NCP party in the presence of Deputy CM Ajit Pawar news updates.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x