5 November 2024 7:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER
x

MBBS Final Year Exam | ८ मार्चपासून परीक्षा ऑफलाईनच होणार

MBBS, final year examination, offline

मुंबई, ०३ मार्च: देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना ८ मार्च पासून MBBS अंतिम वर्ष परीक्षेला सुरुवात होत आहे. विशेष म्हणजे अनेक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्यावी अशी मागणी विद्यापीठ व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्याकडे वारंवार केली होती. परंतु, या परीक्षा ऑनलाइन घेणे शक्य नसून राज्यातील अनेक असे केंद्र, महाविद्यालय आहेत जिथे इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही. (MBBS final year examination will be conduct offline)

त्यामुळे ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य नसून या व पुढील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुद्धा ऑफलाईन घेतल्या जाणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली किंवा ज्या विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची लक्षण दिसतील अशा विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर आयसोलेशन रूमची वेगळी व्यवस्था प्रत्येक परीक्षा केंद्रावर केली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक अजित पाठक यांनी दिली आहे. (This information has been given by Ajit Pathak, Controller of Examinations, Maharashtra University of Health Sciences)

अकोला, अमरावती, नागपूर व विदर्भातील जिल्ह्यामध्ये अनेक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह असल्याने विद्यार्थी परीक्षा कशी देणार? शिवाय इतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून या परीक्षा ऑनलाइन घेण्यात याव्यात अशी मागणी मेडिकलच्या विद्यार्थ्यांकडून वारंवार करण्यात येत असून याबाबत अनेक पत्र विद्यापीठ प्रशासन व वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना पाठवण्यात आले होते. परंतु, त्यानंतर सुद्धा ८ मार्च पासून सुरू होणारी MBBS अंतिम वर्ष परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनेच घ्यावी लागणार असल्याचे विद्यापीठकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

 

News English Summary: MBBS final year exams are starting from March 8 as the prevalence of corona is increasing across the country. It is noteworthy that many students had repeatedly demanded the university and medical education minister Amit Deshmukh to take the exam online. However, it is not possible to take these exams online and there are many centers and colleges in the state which do not have internet connectivity.

News English Title: MBBS final year examination will be conduct offline news updates.

हॅशटॅग्स

#Education(85)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x