22 April 2025 3:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

राज्यात कोरोना झपाट्याने वाढत असताना परप्रांतीय मजुर मोठ्या संख्येने परतू लागले

Migrants, Maharashtra, Trains Reservation Full, Covid 19

मुंबई, ३ जुलै : लॉकडाऊनच्या काळात आपल्या राज्याकडे परतलेल्या मजुरांनी पुन्हा महाराष्ट्रात यायला सुरुवात केली आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर अनेक उद्योग व्यवसाय सुरू झाले आहे. त्यामुळे बिहार, उत्तर प्रदेशातील परप्रांतीय मजुरांनी पुन्हा रोजगाराच्या निमित्ताने महाराष्ट्रात कूच केली आहे. त्यामुळे अनेक विशेष गाड्यांचे बुकींग काही दिवसांपासून फूल झाले आहे. यामध्ये मुंबई, पुण्यात परतणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

महाराष्ट्रात अडकलेल्या परप्रांतीय मुजरांना त्यांच्या राज्यात जाता यावं याकरता केंद्र सरकारकडून १ मेपासून श्रमिक ट्रेन सुरू करण्यात आली होती. या विशेष सेवेचा फायदा घेत अनेक मजूर आपल्या गावाकडे परतले. तसेच, श्रमिक गाडय़ा वगळता रेल्वेकडून १ जूनपासून देशभरातून विशेष रेल्वे गाडय़ा सुरू करण्यात आल्या. श्रमिक रेल्वे केवळ एकाच दिशेने सोडण्यात आल्या. मात्र, या विशेष गाडय़ा दैनंदिन पद्धतीने दोन्ही बाजूने सुरू करण्यात आल्या.

दुसरीकडे महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या अतिशय झपाट्याने वाढत आहे आणि त्यात परराज्यातील मजूर परतु लागल्याने राज्य सरकार मोठ्या संकटात अडकण्याची भीती व्यक्त करण्यात येतं आहे. गुरुवारी राज्यात तब्बल 6 हजार 330 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात वाढलेली ही आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. या नव्या रुग्णांसह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 1 लाख 86 हजार 626वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात एकूण 125 कोरोनाबळींची नोंद झाली, यापैकी 110 मृत्यू मागील 48 तासांत झाले असून 15 मृत्यू त्यापूर्वीचे आहेत. दरम्यान, राज्यात सध्या 77 हजार 260 रुग्णांवर उपचार सुरू असून 1 लाख 01 हजार 172 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

कोणती गाडी कधीपर्यंत फूल:

  • दानापूर पुण स्पेशल – दानापूर (पाटणा) ते पुणे ट्रेन: २० जुलै
  • पुष्पक एक्स्प्रेस स्पेशल – लखनऊ ते छत्रपती शिवाजी टर्मिनस: १७ जुलै
  • खुशीनगर स्पेशल – बादशाहनगर ते लोकमान्य टिळक टर्मिनस – २६ जुलै

 

News English Summary: Migrants from Bihar and Uttar Pradesh have started returning to Maharashtra. Many laborers, who went on foot as well as by labor train, are returning to Maharashtra in large numbers by rail.

News English Title: Migrants Returning To Maharashtra Trains Reservation Full For Next Few Days News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या