15 April 2025 1:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon India Mutual Fund | हीच ती फंडाची स्कीम, पडत्या बाजारातही बक्कळ कमाई, 1 लाखाचे करतेय 5 लाख रुपये SBI FD Interest Rates | एसबीआय बॅंकेकडून ग्राहकांना धक्का, FD व्याजदरात मोठे बदल, नवे दर लक्षात ठेवा Income Tax Notice | सावधान, हे 5 व्यवहार कॅशमध्ये केले तर तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस मिळू शकते, आजच लक्षात घ्या EPFO Pension Money | पगारदारांनो, सॅलरीतून EPF कापला जातो का? रिटायरमेंट आधीच मिळेल पेन्शन, अपडेट समजून घ्या Horoscope Today | 15 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 15 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BPCL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल 45 टक्के परतावा, अशी फायद्याची संधी सोडू नका - NSE: BPCL
x

MIM Corporators Join NCP | लातूरच्या उदगीर नगरपंचायतीत एमआयएमच्या 5 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

MIM Corporators Join NCP

मुंबई, १४ ऑक्टोबर | राज्यात राष्ट्रवादीत इनकमिंग पुन्हा सुरु झालं आहे. मराठवाड्यातील महत्वाच्या लातूरच्या उदगीर नगरपंचायतीत त्याला पुन्हा सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र यावेळी भाजपला नव्हे तर एमआयएमला राजकीय धक्का (MIM Corporators Join NCP) देण्यात आला आहे. MIM’च्या पाच नगरसेवकांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.

MIM Corporators Join NCP. Incoming in NCP has started again in the state. In Udgir Nagar Panchayat of important Latur in Marathwada, Five MIM corporators today joined the NCP in the presence of Deputy Chief Minister Ajit Pawar and NCP state president Jayant Patil :

विशेष म्हणजे या सर्व विद्यमान नगरसेवकांसह त्यांच्या शेकडो समर्थकांनी देखील आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे उदगीर मध्ये राष्ट्रवादीची राजकीय ताकद वाढली आहे. मात्र एमआयएम’ला हा राजकीय धक्का जिव्हारी लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या सर्व नगरसेवकांचे जयंत पाटील यांनी पक्षात स्वागत केले. यावेळी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, राज्यमंत्री संजय बनसोडे, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण आदी उपस्थित होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: MIM Corporators Join NCP in Udgir Nagar Panchayat of Latur.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या