23 December 2024 5:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

यासाठी थोडे दिवस थांबा | कोण घाबरतंय आणि कोण घाबरत नाही हे स्पष्ट होईल - शिवसेना

Minister Anil Parab, Opposition leader Devendra Fadnavis, Mahavikas aghadi MLAs

मुंबई, १८ फेब्रुवारी: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राज्यात मोठी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. पुन्हा एकदा राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असा वाद दिसू लागल्याचं सांगितलं जात असतानाच विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. ‘हे सरकार आपल्याच आमदारांना घाबरत असल्याचं दिसतं आहे. आपल्याच आमदारांना इतकं घाबरणारं सरकार मी पहिल्यांदाच पाहातो आहे’, असं फडणवीस म्हणाले आहेत.

त्यावरून आता शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे परवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना अनिल परब म्हणाले, ‘विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईलच. अधिवेशनातल्या विषयांना सामोरे जायला आम्ही पूर्णपणे तयार आहोत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रम ठरवण्यासाठी बैठक लावली आहे. त्यामुळे आम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही. निवडणूक कधी घ्यायची हे अधिवेशनात ठरेल. कुणी कसं कुणाला मतदान केलं, याचे आकडेही तुमच्यासमोर येणार आहेत. ते आकडे आल्यानंतर सगळ्यांना कळेलच. यासाठी थोडे दिवस थांबा. म्हणजे कोण घाबरतंय आणि कोण घाबरत नाही, हे स्पष्ट होईलच.’

 

News English Summary: Shiv Sena MLA and State Transport Minister Adv. Anil Parab has replied. Replying to the criticism made by Devendra Fadnavis, Anil Parab said, The next decision will be taken after the date of election of the Speaker of the Assembly is fixed. We are fully prepared to address the issues at the convention.

News English Title: Minister Anil Parab reply to opposition leader Devendra Fadnavis over his statement on MLAs news updates.

हॅशटॅग्स

#Anil Parab(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x