VIDEO: आशिष शेलारजी भाजप निवडणूक लढवतं; मग हे नेते काय बोलत आहेत ईव्हीएम'वर?
मुंबई: ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरनं निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करण्यापेक्षा विरोधकांनी आत्मचिंतन करावे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी गुणवत्ता असलेल्या आमदार-पदाधिकारी व अन्य नेत्यांना भाजपात सुरू असलेला प्रवेश आता बंद झाला असला तरी विदर्भातील नेत्यांचे आम्ही स्वागत करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले आहे. ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करणे हे अविश्वास दर्शविण्यासारखे आहे. ते न करता आत्मचिंतन करावे, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, एनसीपी नेते जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे सगळेजण ईव्हीएमला विरोध दर्शवत आहेत. विरोधकांची पत्रकार परिषदही पार पडणार आहे. आगामी निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात यावी अशी मागणी होते आहे. याचसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी ईव्हीएमला विरोध करणाऱ्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे असे म्हटले आहे.
निवडणूक आयोगाला घटनात्मक अधिकार असून निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्या, की ईव्हीएमवर हे आयोगानेच ठरवायचे आहे. घटनात्मक अधिकार असलेल्या आयोगावर अशाप्रकारे जनमानसात संभ्रम निर्माण करणे हे अत्यंत चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे मंत्री आशिष शेलार य़ांनी दिली आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षांनी ईव्हीएमवर टीका करत आंदोलन छेडले आहे. यावर शेलार यांनी टीका केली आहे. पत्रकार परिषद घेऊन जे नेते ईव्हीएमच्या विरोधात बोलत आहेत त्यापैकी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे ईव्हीएम द्वारेच निवडून आले आहेत. त्यांनी आधी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि मगच ईव्हीएम बाबत बोलावे, असे आव्हानच त्यांनी दिले आहे. मात्र भाजपचे जनतेतून निवडून आलेले नेते त्यात लालकृष्ण अडवाणी, रविशंकर प्रसार आणि सुब्रमनियम स्वामी यांनी देखील व रेकॉर्ड ईव्हीएम’वर गंभीर आरोप करत त्यात सहज फेरफार करता येऊ शकतात असं म्हटलं होतं. नेमके तेच आरोप आज राज ठाकरे करत आहेत, मात्र भाजपचे नेते मूळ विषय समजून न घेता विषयाला बगल देत भलत्याच प्रतिक्रिया देत आहेत असं निदर्शनास येते आहे.
दरम्यान आजच्या विरोधकांच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, ‘खरंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या नेत्यांनी यामध्ये सामील होणं अपेक्षित होतं’ आणि नेमका हाच धागा पकडून राज ठाकरे यांनी ही मागणी केली होती. त्यामुळे भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या ईव्हीएम’वरील शंकेने त्यांची देखील निवडणूक पद्धतीवर शंका होती असंच म्हणता येईल.
VIDEO: काय आरोप केले होते भाजपने ईव्हीएम’ला अनुसरून त्याचे पुरावे
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Pan Card Online | 90% लोकांना ठाऊक नाही पॅनकार्ड मार्फत लोन कसा मिळतो, कशा पद्धतीने अप्लाय करा, माहिती जाणून घ्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर 1,723 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, ब्रोकरेज रिपोर्ट जारी - NSE: RELAINCE
- Home Loan Benefits | गृहकर्ज घेणे डोक्याला टेन्शन वाटतंय, आधी हे फायदे सुद्धा समजून घ्या, मिळतील अनेक फायदे
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरवर टॉप ब्रोकरेज बुलिश, शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- Kotak Mutual Fund | बिनधास्त SIP करून 4 पटीने पैसा वाढवा, श्रीमंत करणारी म्युच्युअल फंड स्कीम सेव्ह करा
- RVNL Share Price | टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, RVNL शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: RVNL
- Shark Tank India | महिला सुद्धा सुरु करू शकतात असा स्टार्टअप, आई-मुलीच्या स्टार्टअपला शार्क टँक इंडियातून फंडिंग
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांनो इकडे लक्ष द्या, 'ही' म्युच्युअल फंड योजना 1 लाखांवर देईल 6,13,521 रुपये परतावा