22 December 2024 1:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका Motilal Oswal Mutual Fund | जबरदस्त फंड, 4 ते 5 पटीने परतावा मिळेल, दरवर्षी 44% दराने पैसा वाढले IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC Quant Mutual Fund | पैशाचा पाऊस पाडत आहेत या म्युच्युअल फंड योजना, 10 लाखाचे होतील 67 लाख रुपये, पैसा वाढवा Mutual Fund SIP | बँक FD विसरा, श्रीमंतीचा मार्ग खुला करा, या फंडात 58 टक्क्यांनी पैसा वाढेल, लिस्ट सेव्ह करा
x

भाजपाची बैठक मराठा आरक्षणासाठी नव्हे तर आंदोलनासाठी आहे - अशोक चव्हाण

Maratha reservation

मुंबई, १८ मे | सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे. या पार्श्वभूमीवर पुढील रणनीती ठरविण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरू झाली आहे. तर, मराठा आरक्षणावर पुढील दिशा ठरवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने देखील महत्त्वाची बैठक बोलावली आहे. त्यामुळे या दोन्ही बैठकांमध्ये काय निर्णय होतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द ठरवलं आहे. त्यानंतर केंद्र सरकारने आरक्षणप्रश्नी कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळ उपसमितीची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होत आहे. या बैठकीला मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण उपस्थित आहेत. तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटेही उपस्थित आहेत.

एककीकडे मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सुरू होत असतानाच भाजपनेही मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी ही बैठक सुरू झाली आहे. मात्र या बैठकीबाबत अशोक चव्हाण यांना विचारले असता ते म्हणले की, “भाजपाची बैठक मराठा आरक्षणासाठी नव्हे तर आंदोलनासाठी आहे’. अशी प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण यांनी भाजप केवळ स्वतःचा राजकीय स्वार्थ साधत असल्याचा अप्रत्यक्ष संदेश दिला आहे.

 

News English Summary: On the one hand, while the meeting of the Cabinet sub-committee is starting, the BJP has also called a meeting to discuss the Maratha reservation. The meeting started at the residence of Leader of Opposition Devendra Fadnavis at Sagar. However, when asked about the meeting, Ashok Chavan said, “The BJP meeting is not for Maratha reservation but for agitation.

News English Title: Minister Ashok Chavan criticized BJP over Maratha Reservation politics news updates.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x