5 November 2024 4:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

भाजपने राज्यात काँग्रेस संपवण्याचे काम सुरु केले होते | म्हणून काँग्रेसने...

Minister Ashok Chavan, Shivsena, BJP, MahaVikas Aghadi

परभणी, ३० ऑक्टोबर: काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या आग्रहामुळे महाविकासआघाडी प्रत्यक्षात आली असा गौप्यस्फोट केला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीतील काँग्रेस नेते शिवसेनेसोबत युती करण्यास अनुकूल नव्हते असं देखील त्यांनी म्हटलं आहे. भाजपने काँग्रेस संपवण्याचे काम सुरु केले होते. त्यामुळे काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत येण्यास तयार झाला. दिल्लीतील काँग्रेसचे नेते शिवसेनेसोबत युती करायची की नाही, या संभ्रमात होते. पण भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेबरोबर आघाडी करावी, असे राज्यातील काँग्रेस नेत्यांचे मत होते असे अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी परभणीतील बडे नेते सुरेश नागरे यांनी काँग्रेसला रामराम ठोकला होता. त्यांनी पक्षात घरवापसी केली आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत सुरेश नागरे यांचा पक्षप्रवेश झाला आहे. यावेळी सुरेश नागरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. परभणी शहरातील एमआयडीसी भागातील व्यंकटेश मंगल कार्यालयात बैठक झाली. जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसींच्या पदाधिकाऱ्यांना अशोक चव्हाणांच्या हस्ते नियुक्त पत्रांचे वाटप करण्यात आले

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाही. व्हिडीओ कॉन्फरर्सद्वारे चर्चा करीत नाहीत. ते काय प्रश्न सोडविणार? त्यांना भेटून काय उपयोग? त्यांनी सरकार चालविण्याचे कंत्राट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे दिले आहे, असा टोला भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी लगावला होता. चंद्रकांत पाटील यांच्या या विधानावरुन आता शिवसेनेनंही प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे हेच राज्य चालवतात. तसेच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि शरद पवार यांचा वेळोवेळी सल्लाही घेतात, असं मंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी सांगितले आहे.

 

News English Summary: Senior Congress leader Ashok Chavan has made a secret statement that the Mahavikasaghadi actually came about due to the insistence of the Congress leaders in the state. He also said that Congress leaders in Delhi were not in favor of forming an alliance with Shiv Sena after the Assembly elections. The BJP had started the work of ending the Congress. Therefore, the Congress party was ready to come with the Shiv Sena. Congress leaders in Delhi were confused as to whether to form an alliance with Shiv Sena. But Congress leaders in the state were of the view that the BJP should form an alliance with the Shiv Sena to stop it, said Ashok Chavan.

News English Title: Minister Ashok Chavan on alliance with Shivsena after Maharashtra assembly election News updates.

हॅशटॅग्स

#AshokChavan(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x